स्मार्ट बुलेटिन | 29 सप्टेंबर 2021 | बुधवार | एबीपी माझा

मराठवाडा, विदर्भासह राज्यभरात पावसाचा कहर सुरुच, समन्वयाने मदतकार्य राबवण्याचे सरकारकडून यंत्रणांना निर्देश

'गुलाब'नंतर अरबी समुद्रात 'शाहीन' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती

साकीनाका बलात्कार प्रकरणी 18 दिवसांत आरोपपत्र दाखल, 77 साक्षीदारांचे जबाबही नोंदवले

राज्यात काल 2, 844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97.26 टक्क्यांवर

कोरोना लसीऐवजी रेबिजचं इंजेक्शन, ठाण्यातील धक्कादायक प्रकार; डॉक्टर, परिचारिका निलंबित

सीरम इंस्टिट्यूटला मिळाली 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलला परवानगी

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द, 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे 10 रूपयांना

पंजाबमधलं राजकारण तापलं, नवज्योतसिंह सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मुंबईची पंजाबवर 6 विकेट्सने मात, प्लेऑफच्या आशा कायम, तर कोलकात्याचा दिल्लीवर विजय