Beed: धारूर बस डेपोच्या समोर आज सकाळी केज वरून माजलगावला (Majalgaon) जाणाऱ्या ट्रॅक्टर खाली येऊन आठ वर्षीय बालकाचा चेंगरून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना अरुंद रस्ता असल्याने झाली आहे. अरुंद रस्त्यामुळं आणखी कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी जाणार आहेत? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
धारूर येथील बस डेपोच्या समोर केजवरून माजलगावकडे जाणारे ट्रॅक्टर एम एच 44 डी. 1908 च्या खाली चेंगरून शिवराज सुरवसे या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरवसे यांचे बस डेपोच्या बाजूला जनावरांचा कोटा आहे. त्या जागेत त्यांचे जनावरे बांधले जातात सकाळी शिवराज व त्याची आज्जी दूध आणण्यासाठी गेले होते. सकाळी 9 च्या दरम्यान दूध काढून घराकडे परतत असताना केजवरून माजलगावला जाणारा ट्रॅक्टर च्या खाली शिवराज आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय.
नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
या घटनेनंतर जेसीबी यंत्राच्या साहाय्यानं ट्रकटर उचलून मृत बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी प्रयत्न केले. आंबेडकर चौकातून घाटपाटीकडे अतिशय अरुंद रस्ता आहे. यामुळे याठिकाणी नेहमीच अपघाताची मालिका घडून येते. यात बऱ्याच निष्पाप नागरिकांना बळी जात आहे. आणखीन किती बळी घेतल्याच्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.
हे देखील वाचा-
- Aurangabad : देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांनी थांबवली रेल्वे
- Solapur News : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मारहाण केल्याने मृत्यू, सात पोलिसांवर गुन्हा दाखल
- Aurangabad Crime : धक्कादायक! लाईट चोरल्याच्या संशयावरून हात-पाय बांधून तरुणाला मारहाण करत हत्या; मारहाणीचा Video Viral