Ashish Shelar : सध्या राज्यात विजेची टंचाई भासत आहे. त्यामुळे भारनियमन सुरु करण्यात आले आहे. या मुद्यावरुन विरोधक मात्र राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत आहेत. भारनियमनाचे चटके सगळ्यांना बसत आहेत. तीन आठड्यापासून अघोषित भारनियनमन सुरु असून, सरकारचा टंचाई आणि टक्केवारीचा प्रकार चालू असल्याची टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली. टंचाई निर्माण करायची आणि चढ्या दराने वीज घ्यायची आणि कंपनीकडून टक्केवारी घ्यायची असे काम सुरु असल्याचे शेलार म्हणाले.


देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात आली आणि वीज नाही असं सांगण्यात आल्याचे शेलार म्हणाले. तिन्ही कंपन्यांचे काम बेशिस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचे शेलार म्हणाले. सध्या भारनियन निर्माण केलं जातं आहे. याविरोधात भाजपा उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सलग ७ दिवस हे आंदोलन  सुरु राहणार आहे. राज्यभर भाजप कार्यकर्ते वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. तीन पक्षाने राज्याला वेठीस धरले असल्याचा आरोप यावेळी शेलार यांनी केला. आमच्या काळात कंपन्या फायद्यात होत्या कारण देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी योग्यवेळी पैसे दिला. पण आता काँग्रेसचे ऊर्जामंत्री आणि राष्ट्रवादीचे वित्तमंत्री यामुळे ढिसाळ काभार सुरु आहे. कारण अधिवेशनात देखील दोघे वेगळे निर्णय घेत होते. ते या अधिवेशनात देखील दिसले. कारण अजितदादा म्हणायचे वीज तोडू नका अणि राऊत म्हणायेच बिल भरा. यातूनच दिसत होत की हे सरकार काय काम करतेय ते असे शेलार म्हणाले.


हनुमान चालीसा कार्यक्रमाचे स्वागत


अजान, भोंगे, हनुमान चालीसा या सगळ्यांना वीज लागणार आहे. बाकीच्यांना यावर लक्ष द्यायला वेळ नाही पण भाजपा यावर लक्ष ठेवून असल्याचे शेलार यांनी सांगितले. अनधिकृत भोंग्यावर कारवाई झालीच पाहिजे. जर सरकारने अनधिकृत भोंग्याना अधिकृत करण्याचा प्रयत्न केला तर जशास तशे उत्तर देऊ असेही शेलार म्हणाले. हनुमान चालीसा कार्यक्रम झाले तर त्याचे स्वागतच आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे इथला 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर येऊन हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्धार आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
याला शिवसेना विरोध का करत आहे. शिवसैनिक कायदा का हातात घेत आहेत असा सवाल शेलार यांनी केला. राणा दाम्पत्य काही आतंकवादी आहेत का? हनुमान चालीसा म्हणणं चुकीचं आहे का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. शर्गील उस्मान आला होता तेव्हा तुम्ही कुठं होता, असेही शेलार म्हणाले.


पोलिसांच्या बदल्याबाबत सरकारता रात्रीस खेळ चाले


पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यामध्ये सरकारचा रात्रीस खेळ चाले असा प्रकार सुरु असल्याचे आशिष शेलार म्हणाले. विनाकरण निर्णय बदलेले जात आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? यात देखील कोणी दलाल आहेत का? असे सवाल यावेळी आशिष शेलार यांनी उपस्थित केले.


महत्त्वाच्या बातम्या: