मुंबई : राज्यात आज दोन ठिकाणी मोठे अपघात झाले असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे. धाराशिवमध्ये एका टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात तीनजण ठार झाले. तर विरारमध्ये एका खासगी ट्रॅव्हल्सने मोटारसायकलला धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा पती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Dharashiv Accident : धाराशिवमध्ये तीन ठार
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लातूर रस्त्यावरील माडजपाटी जवळ टेम्पो आणि मोटरसायकलस्वाराचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो लातूरहून उमरग्याकडे येत होता. तर मोटरसायकलस्वार लातूरला जात होता. अपघातात दुचाकीस्वारासह टेम्पो मधील दोघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातातील मृतांची नावे
1. दिगंबर कांबळे, येळी (उमरगा)
2. दीपक गणू रामपुरे, मंगरूळ (औसा)
3. आकाश सूर्यकांत रामपुरे, मंगरूळ (औसा).
Virar Accident : विरारमध्ये पती-पत्नीला वेगवान ट्रॅव्हल्सची धडक
विरारमध्ये एका खाजगी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रव्हल्सने दुचाकीवरुन जाणाऱ्या पती पत्नीला उडविले. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमी पतीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
विरार पूर्व संत नगर येथील डीमार्ट जवळ सोमवारी दुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली आहे. विरार पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेहासह ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली आहे. मात्र चालक फरार झाला आहे.
विरार पूर्व नालासोपारा लिंक रोड, विवंता हॉटेल समोरील मोरेगाव रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स अनधिकृत पार्किंग करून उभ्या असतात. मुख्य रस्त्यावर, वळणावर ट्रॅव्हल्स चालक भरधाव वेगात वाहन चालवतात. त्यांना कोणी अडवले तर ते दादागिरी करतात. त्यामुळे या ट्रॅव्हल्सवरही कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ही बातमी वाचा: