Maharashtar Weather News : महाराष्ट्रात (Maharashtar)  सातत्यानं हवामानात बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं उन्हाचा चटका तर कुठं अवकाळी पाऊस (Unseasonal rain) हजेरी लावत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, वाशिम (washim) जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं जरी शेतकऱ्यांचा काही नुकसान होणार नसलं तरी मात्र गारपीट किंवा अती पाऊस झाल्यास येत्या जूनमध्ये येणाऱ्या पावसाला विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी 


हवामान विभागानं (IMD) राज्यातील काही भागात अवकाळी पावासाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे. त्यानुसार काही भागात पाऊसही झाला आहे. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, पाऊस आणि अती गारपीट झाली तर जूनमध्ये येणाऱ्या पावसाला विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं आता जास्त होणारा पाऊस पुढे अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या पाऊस पडल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना जास्त फटका बसणार नाही. कारण शेतकऱ्यांची बऱ्यापैकी काम उरकली आहेत.  


एकीकडं उन्हाचा चटका, दुसरीकडं पावसाचा तडाखा


सध्या राज्यात एकीकडं उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचा पारा 38 ते 40 अंशावर गेलाय. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढं देखील गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडं राज्यात अवकाळी पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थिती राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.    


काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा


दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात पुढच्या तीन दिवसासाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नागपूर वेध शाळेने हा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. 


महत्वाच्या बातम्या:


Rain Alert : धो-धो कोसळणार! आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट