मात्र तरीही सर्वांकडेच पॅन कार्ड आहे, असं नाही. आजही 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना पॅन कार्ड किंवा आधार कार्ड काढले आहे का असं विचारलं तर किमान तीन जण तरी नाही असं उत्तर देतील. पण कोल्हापूरमध्ये सर्वात लहान वयातील पॅन कार्डधारकाची नोंद झाली आहे.
या पॅनकार्ड धारकाचं वय वर्षात नाही, महिन्यात नाही तर दिवसात आहे. कारण अवघ्या 5 दिवसाच्या मुलाचं पॅनकार्ड काढण्यात आलं आहे.
स्वराज अमोलदादा पाटील....महाराष्ट्रातील एक नंबरचा आणि देशातील दोन नंबरचा सर्वात कमी पॅनकार्डधारक....कोल्हापुरातील शुक्रवार पेठेमध्ये अमोलदादा पाटील आणि त्यांचं कुटुंब राहतं. 9 जानेवारी 2017 रोजी पाटील यांच्या पत्नीनं बेळगावजवळच्या रायबागमध्ये मुलाला जन्म दिला आणि पेशानं करसल्लागार असलेल्या अमोलदादा यांनी स्वराज नावानं मुलाचं अगदी पाचव्याच दिवशी पॅनकार्ड काढलं.
याआधी बिहारमधल्या एका मुलीचं पाचव्या दिवशी पॅनकार्ड काढलं होतं.
अमोलदादा यांनी स्वराजचं पॅनकार्ड काढल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरी पोस्टानं हे पॅनकार्ड आलं.
पॅनकार्ड आणि आर्थिक नियोजन याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळेच आपल्या बाळाचं लवकरात लवकर पॅनकार्ड काढण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला.
अनेकजण अजूनही पॅनकार्ड असेल किंवा आधारकार्ड काढण्यासाठी उत्सुक नसतात. 18 वर्षाखालील मुलांचं पॅनकार्ड काढण्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण मुलाच्या पहिल्या दिवशीही पॅनकार्ड काढता येतं.
कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा बँकेमध्ये पॅनकार्ड सक्तीचं केलं आहे. नोटाबंदीच्या दरम्यान त्याचा फटका अनेकांना बसलाही असेल. पॅनकार्ड त्वरीत काढणं हे संबंधित व्यक्तीच्याच फायद्याचं असतं.
मुलाच्या नावे आतापासून नियोजनपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड महत्त्वाचं आहे, असं अमोल पाटील यांनी सांगितलं.