सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांसाठी जवळच 17 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसद्वारे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे. प्रवाशांना मदत आणि उपयोगी साहित्य पुरवण्यात आले आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याने प्रवाशांचे हाल,बाळाच्या दुधासाठी आईची हाक | कल्याण | ABP Majha
सध्या या प्रवाशांना बदलापूर स्थानकावर पोहोचवले जात आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचाव कार्याबद्दल सांगितले की, 19 डबे असणारी विशेष ट्रेन महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला जाणार आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी 12 तासांनंतर NDRF दाखल | ABP Majha
बचाव कार्य सुरु असताना प्रशासनाने घटनास्थळी 37 डॉक्टर्स पाठवले होते. या डॉक्टरांनी बचाव कार्यानंतर सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी केली. दरम्यान, आरपीएफ आणि नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बिस्किटं आणि पाणी दिले.
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचं नेव्ही, एअर फोर्सकडून रेस्क्यू ऑपरेशन | ABP Majha
दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये रेस्क्यू सुरु असतानाच गाडीत 9 गर्भवती महिला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासनाने प्राधान्याने गर्भवती महिलांच्या रेस्क्यूला सुरुवात केली. संध्याकाळी चार वाजेपर्यंत गाडीत असलेल्या गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. 37 डॉक्टरांच्या मदतीनं या महिलांवर उपचार केले जात आहेत. सध्या सर्व महिलांची प्रकृती ठिक आहे. परंतु सकाळी एका महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर महिलेचे हाल झाले.
Central Railway Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: A special train with 19 coaches will leave from Kalyan to Kolhapur with the passengers of Mahalaxmi Express. #Maharashtra pic.twitter.com/lKFs8y54hc