Mahadev Munde: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल 15 महिने उलटून गेले, तरी अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत. न्याय मिळावा आणि दोषींना तातडीने अटक व्हावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबियांसह बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत. यावेळी त्या पोलिसांना 10 दिवसांचा अल्टिमेटम देणार असून, जर आरोपींवर कारवाई झाली नाही, तर कुटुंबासोबत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे SIT आणि CID च्या हवाली करावेत अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान आता आणखी किती वेळ वाट पहायची? असा सवाल करत ज्ञानेश्वरी मुंडेंनी आमरण उपोषणाचा आक्रकम पवित्रा घेतलाय. त्यांनी 10 दिवसांत ठोस कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसू असे त्या म्हणाल्यात. (Beed)
15 महिने उलटले, आरोपी मोकाटच
महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली असली, तरी अजूनही कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिस तपासाला वेग मिळावा यासाठी भाजप नेते सुरेश धस यांनीही मागणी केली होती, मात्र तरीही 15 महिने उलटले तरी तपासामध्ये कोणतीही प्रगती दिसून येत नाही. त्यामुळे कुटुंबाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ठणकावून सांगितले की, “पोलिसांनी आणखी किती वेळ घेत राहायचा? आम्ही न्याय मिळण्याची वाट पाहत बसणार नाही. 10 दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही आमरण उपोषणाला बसू.” असं त्या म्हणाल्या.
न्यायासाठी लढा तीव्र होणार?
परळीमधीलच मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 60 दिवस उलटले, तरी या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे. पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप होत असून, दुसरीकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपास 14 महिने रखडल्याचा धक्कादायक खुलासा झाला. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले की, “आम्ही बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना 3 दिवसांची अंतिम मुदत देणार आहोत. जर यातही काही झाले नाही, तर आम्ही संपूर्ण कुटुंबासह आमरण उपोषण करू.” या प्रकरणाचा पुढील तपास आणि प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: