या सर्व घडामोडीनंतर जानकरांनी आज याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. 'खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही.' असं म्हणत जानकरांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
महादेव जानकर यांची प्रतिक्रिया:
- ना. महादेव जानकर, मंत्री, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य
महादेव जानकर यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे
काय आहे संपूर्ण प्रकरण:
जानकरांची अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका
दसरा मेळाव्याला भगवानगडावर काल भाषण करताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी, अजित पवार आणि धनंजय मुंडेवर आक्षेपार्ह टीका केली होती. “बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा घणाघात जानकरांनी अजित पवारांवर केला. त्याविरोधात राज्यभर विविध ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
‘बारामती’चं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही : महादेव जानकर
जानकरांना बडतर्फ करा : मुंडे
महादेव जानकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लॉयल चमचा, असा उल्लेख करत महादेव जानकरांनी विधानपरिषद, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याचा अपमान केला. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार आहोत, असंही मुंडे म्हणाले.
संबंधित बातम्या:
अजित पवारांबाबतच्या विधानावर तीन दिवसांनी बोलेन : जानकर