Mahadev Jankar Loksabha Eletion: राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढची म्हणजे 2029 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा (Baramati Loksabha Election) मतदारसंघातून लढवणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे. ते अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर इथं बोलत होते. जानकर यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून परभाव झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांनी त्यांचा मोठा मतांनी पराभव केला होता. 


परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव का झाला?


परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचेही जानकर यांनी सांगितले. परभीणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर हे महायुतीकडून निवडणूक लढले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे होते. तर वंचित बहुजन आघाडूकडून हवामान अभ्यायासक पंजाबराव डख हे देखील निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत संजय जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने महादेव जानकर यांचा पराभव केला होता. दरम्यान, आता जानकरांनी पुढची निवडूख बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवण्याचे जाहीर केले आहे. बारामतीत ताकदीने लढून विजयी होणार असल्याचा विश्वास देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केला. 


सुरुवातीला माढा लोकसभा लढवण्याची होती चर्चा


दरम्यान, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतादरसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाची जागा जानकर यांना सोडल्याचे जानकरांनी देखील कबुल केले होते. मात्र, अचानक जानकरांनी फडणवीसांची भेट घेत आपण महायुतीकडूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर महादवे जानकरांना महायुतीकडून परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. त्यांच्या विजयासाठी परभणी लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी सभा देखील घेतल्या होत्या. पण अखेर या मतदारसंघात महादेव जानकर यांचा पराभव झाला. 


पिक विमा कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा 


अकोला जिल्ह्यात पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आली आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे. या कंपन्यावर केसेस केल्या तरच या कंपन्या ताळ्यावर येतात, असेही जानकर म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Mahadev Jankar : मेलो तरी चालेल पण कमळावर कधीही लढणार नाही; महादेव जानकर असं का म्हणाले?