दरम्यान, शोधपथकानं स्थानिक मच्छिमारांची मदत घेऊन तिसऱ्या दिवसाचं शोधकार्य सुरु केलं आहे. मात्र, दोन्ही बस आणि इतर वाहनं कुठे आहेत, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही.
फिश फाईंडरची मदत
स्थानिक मच्छिमारांनी त्यांच्या पद्धतीने शोधकार्य सुरु केलं आहे. आधी त्यांनी नांगर टाकून शोधकार्य सुरु केलं. मग त्यांनी फिश फाईंडरची मदत घेतली आहे. त्यांच्याकडे कॅमेरा सदृश्य यंत्र आहे, जे पाण्यात सोडल्यानंतर खालील परिस्थितीची दृश्य बोटीतील स्क्रीनवर दाखवतं. हे यंत्र जहाज किंवा बोटीतून मासेमारी करण्यासाठी गेल्यानंतर वापरतात. बोट किंवा जहाजातून प्रवास करताना खाली खडक किंवा बुडालेलं जहाज वैगेरे असेल तर त्याची कल्पना हे यंत्र देतं.
त्यामुळे दोन भल्यामोठ्या एसटी बसेस, तवेरासह गायब वाहने सापडण्याच्या आशा बळावल्या आहेत.
कोकणातील कोळी एकवटले
महाड पूल दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशीही एसटी बसचा शोध न लागल्यामुळे, शोधपथकाच्या मदतीला कोकणातील कोळीबांधव आले आहेत. सकाळपासून मालवण, सिंधुदुर्ग, रेवस इथून मच्छिमारांची पथकं महाडमध्ये सावित्रीनदीजवळ दाखल झाली आहेत.
ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला. या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
देवदूत… काळरात्री शेकडों जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
LIVE : महाड दुर्घटना: आतापर्यंत 20 मृतदेह सापडले
महाड दुर्घटना : गुरुवारी दिवसभरात काय घडलं?
महाड दुर्घटना : आतापर्यंत सापडलेले मृतदेह आणि त्यांची नावं
एसटी चालक कांबळेंचा मृतदेह हाती, मुलगा अद्यापही बेपत्ता
महाड पूल दुर्घटना : कोणाचा मृतदेह कुठे सापडला ?
महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री