बुलंदशहर कोर्ट परिसरात तीन तरुणांनी महिलेची छेडछाड केली. या तिघांमध्ये एकाने चेहऱ्याला फडका बांधला होता. महिलेने छेडछाडीला विरोध केल्यानंतर दोघे पळून गेले. मात्र, एका आरोपीला महिलेने पकडून ठेवले आणि भर रस्त्यात तुफान धुलाई केली.

धक्कादायक म्हणजे, ही घटना घडत असताना आजूबाजूला लोकांची गर्दी होती. मात्र, कुणीही महिलेला मदत करण्यासाठी पुढे सरसावला नाही. महिलेने छेडछाड करणाऱ्यांचा विरोध केल्यानंतर पोलीस पुढे आले आणि त्यानंतर उपस्थित लोकही पुढे आले.
बुलंदशहरात सातत्याने असे प्रकार समोर येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.