महाड : दुथडी भरून वाहणाऱ्या महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरुवात झाली आहे. मात्र जीवाची बाजी लावून बचावकार्य करत असलेल्या एनडीआरएफच्या जवानांची एक बोट उलटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने बोटीतील सर्व जवान सुरक्षित आहेत.


अखेर महाडमधील शोधकार्याला पहिलं यश!


 


पुलासह एसटी बस वाहून गेल्या

मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला आलेल्या पुरात एक ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. यावेळी पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर- बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.


महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?




जवानांचं बचावकार्य युद्धपातळीवर

दरम्यान यानंतर एनडीआरएफ, नौदल, हवाईदल, तटरक्षक दल, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. परंतु बुधवारी रात्रभर सुरु असलेला पाऊस आणि अंधारमुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळपासूनच एनडीआरएफ, नौदल आणि कोस्टगार्डने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.


महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार


 

सावित्रीच्या पात्रात बोट उलटली

मात्र, या बचावकार्याला लागलेल्या जवानांना अनंत अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. एनडीआरएफ आणि नौदलाच्या अनेक बोटी सावित्रीच्या पात्रात बुडालेल्या वाहनांचा शोध घेत आहेत. अशाच एका बोटीला हा अपघात झाला होता. सुदैवाने या बोटीतील सर्व जवान सुखरुप आहेत.

 

महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता


 

बचावकार्यात अनंत अडथळे

पुराचं पाणी आणखी ओसरल्याशिवाय बचावकार्याला वेग येणार नाही, असं एनडीआरएफ आणि नौदलातर्फे सांगण्यात आलं आहे. प्रवाहाच्या विरोधात बोट नेण्याचा प्रयत्न जवान करत आहेत, मात्र पाण्याचा वेग अतिशय जास्त असल्याने त्यांना यश येत नाही.

सावित्री नदीत शोधकार्य सुरु, चुंबकाला लोखंडी वस्तू चिकटली



चुंबकाला काय चिकटलं?

सावित्री नदीवरचा पूल कोसळून मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन एसटीसह सात ते आठ वाहनं बुडाली आहेत. मात्र शोधकार्य अंधुक प्रकाशामुळे थांबवल्यानंतर चुंबकाच्या साहाय्याने एक वस्तू सापडल्याचं सांगण्यात येत आहे. नदीपात्रातील ही लोखंडी वस्तू एखादं वाहन आहे की दुसरी काही वस्तू हे अद्याप समजू शकलेलं नाही. अंधार झाल्यानं काल ही वस्तू बाहेर काढता आली नाही. त्यामुळं पोलीस आणि बचाव पथकानं चुंबक नदीपात्रात लोखंडी वस्तूला तसंच ठेवलं आहे. आज सकाळी जाळी लावून ही वस्तू बाहेर काढली जाईल.