औरंगाबाद: औरंगाबादमध्ये गोदावरीच्या पुरात अडकलेल्या १७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आल्यानं या पुरात जवळपास ४० जण  अडकलेत. यानंतर एनडीआरएफच्या 25 जवानांच्या तुकडीचं सकाळपासून बचावकार्य सुरु झालं आहे. यामध्ये  शिंदे वस्तीतून 17 जणांना पुरातून बाहेर काढण्यात आलं आहे.


 

वैजापूर तालुक्यातील 12 गावांना पाण्याचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच वैजापूर-श्रीरामपूर महामार्ग पाण्याखाली गेला आहे.

 

वगावातील 50 ते 60 घर पाण्याखाली आहेत. 50 कुटुंब आणि 250 नागरिकांना वारी जिल्हा परीषद शाळेत हलवण्यात आलं आहे. 12 गावातील 3 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

पावसाच्या पाण्यात शिंदे वस्ती, सरलाबेट आणि सय्यद वस्ती  मिळून 400 लोक अडकले आहेत. एनडीआरएफच्या जवानांच एक पथक पुण्याहुन औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे.

 

गोदावरी नदीममध्ये 2 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.