महाड (रायगड) : रात्रीच्या काळ्यामिट्ट अंधारात सावित्री नदीच्या पोटात गडप झालेल्यांचा शोध आज सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. मात्र रात्रीपासूनच्या धुँवाधार पावसाने शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. कालपर्यंत 14  मृतदेह हाती लागले आहे. यात 11 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.   मात्र एकूण 42 जण बेपत्ता असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. त्याचसोबत नदीत बुडालेल्या 2 एसटी बस आणि तवेरा गाडीचेही अवशेष अजून मिळालेले नाहीत. लोहचुंबकाच्या मदतीनं लोखंडी वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.   महाड दुर्घटनेतील मृतांची नावं  
महाड दुर्घटनेतील दुर्दैवी बळी कुठे सापडला मृतदेह? किती अंतरावर?
श्रीकांत कांबळे आंजर्ले 130 किमी
शेवंती मिरगल हरिहरेश्वर 80 किमी
रंजना वाजे केंबुर्ली 80 किमी
पांडुरंग घाग केंबुर्ली 80 किमी
आवेद चौगुले दादलीपूल 3 किमी
प्रशांत माने म्हसळा 40 किमी
स्नेहा बैकर विसावा कॉर्नर 2.5 किमी
प्रभाकर शिर्के केंबुर्ली 8 किमी
रमेश कदम वराठी 10 किमी
मंगेश काटकर आंबेत म्हाप्रळ 25 किमी
सुनील बैकर आंबेत म्हाप्रळ 25 किमी
अनिश बलेकर आंबेत म्हाप्रळ 25 किमी
जयेश बने आंबेत म्हाप्रळ 25 किमी
बाळकृष्ण उरक केंबुर्ली 8 किमी
  एबीपी माझा वेब टीम