सावित्री नदीवरचा पूल कोसळून दोन एसटींसह सात ते आठ वाहनं बुडाल्यानंतर चुंबकाच्या साहाय्यानं वाहनांचा शोध सुरु आहे. ज्यात नदीपात्रात एक लोखंडी वस्तू सापडल्याचं कळतं आहे. मात्र, अंधार झाल्यानं ही वस्तू बाहेर काढणं अशक्य झालं. त्यामुळं पोलीस आणि बचाव पथकानं चुंबक नदीपात्रात लोखंडी वस्तूला तसंच ठेवलं आहे. उद्या सकाळी जाळी लावून ही वस्तू बाहेर काढली जाईल.
अर्थात चुंबकाला चिकटलेली वस्तू कुठली कार आहे, किंवा एसटी बस किंवा आणखी काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
दरम्यान, शक्तीशाली चुंबकाच्या मदतीनं सावित्रीत नदीमध्ये बुडालेल्या वाहनांचा शोध घेण्यात येतो आहे. नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळं पाणबुड्याच्या मदतीनं शोध घेणं जवळपास कठीण आहे. अशा वेळी बचाव पथकाकडून चुंबकाच्या मदतीनं वाहनांचा शोध घेतला जातो.
संबंधित बातम्या: