महाड (रायगड): मुलाला मुंबईच्या कॉलेजात प्रवेश मिळावा म्हणून एस. एस. काबंळे यांनी डेपो मॅनेजरला विनंती करुन मुंबईची ड्युटी मागून घेतली. त्या रात्री मुलालाही त्यांनी सोबत घेतलं. पण त्या काळरात्रीनं घरातल्या कर्त्या पुरुषालाच हिरवून घेतलं. तर कांबळेंचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे.


 

महाड दुर्घटनेत जयगड-मुंबई एसटीचे चालक एस.एस. कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण धक्कादायक बाब म्हणजे या बसमध्ये कांबळेंसोबत त्यांचा 17 वर्षीय धाकटा मुलगा महेंद्र कांबळे हा देखील होता.

 

महेंद्र मुंबईतील एका कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी जात होता. त्यासाठी कांबळे यांनी डेपो मॅनेजरकडे विनंती करुन मुंबईची ड्युटी मागितली होती. दापोलीतल्या आंजर्लेजवळ कांबळे यांचा मृतदेह सापडला असून महेंद्र अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे.

 

दरम्यान, मुंबईला जाण्यासाठी कांबळे यांनी चालक सुरेश मालप यांच्याकडून चिपळूणमध्ये एसटीचा ताबा घेतला होता.