LIVE : महाड दुर्घटना: केंबुर्ली नदीकाठी तिसरा मृतदेह
पहिला मृतदेह : जयगड-मुंबई एसटीचे चालक एस. एस. कांबळे
अंगावर खाकी वर्दी आणि बॅच क्रमांक सापडल्यानं मृतदेहाची ओळख पटली
कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी)
कुठे सापडला? : घटनास्थळापासून 130 किमी अंतरावर आंजर्ल्याजवळ
महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता
दुसरा मृतदेह : शेवंती मिरगळ (वय अंदाजे 65 वर्ष)
गुहागरमधून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी महिला प्रवासी
कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी)
कुठे सापडला? : सावित्री नदी पुलापासून अंदाजे 80 ते 90 किमीवर हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर
तिसरा मृतदेह : संपदा वझे (वय अंदाजे 35 ते 45 वर्ष)
गुहागरमधून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी महिला प्रवासी
कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी)
कुठे सापडला? : सावित्री नदी पुलापासून अंदाजे 5 ते 7 किमीवर केंबुर्ली नदीकाठी