महाड (रायगड) : महाडच्या दुर्घटनेत गुहागरहून मुंबईकडे निघालेली तवेरा कार बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या तवेरातून प्रवास करणारे आठ जणही बेपत्ता झाले आहेत.

 

LIVE : महाड पूल दुर्घटना : मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल


 

रात्री 11 वाजता तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी पोलादपूरमध्ये जेवण केलं होतं. तोपर्यंत प्रवाशांशी संपर्क झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे. मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणारे 8 जण पूल दुर्घटनेत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?



आतापर्यंत बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा आकडा 30 वर पोहचला आहे. फक्त दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या पूल वाहून गेला आहे.  या पुरात 2 बसेस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार



नदीत दूरपर्यंत बेपत्ता वाहनं आणि लोकांचा शोध घेतला जात आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.