मुंबई: जागा काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो की शिवसेनेची, सगळ्या जागा निवडून आणू असा निर्धार मविआच्या (Maha Vikas Aghadi) पहिल्याच बैठकीत झाल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी मविआची पहिली बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी भूमिका मांडताना सर्व 48 जागा निवडून आणू, असा निर्धार व्यक्त केला.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांवर चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असून यापुढच्या 30 तारखेच्या बैठकीला असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागा कुणाच्याही वाटेला जावो, सर्व जागा निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला


राज्यातील सर्व म्हणजे 48 जागा हा कोणत्याही एका पक्षाच्या असतील असं न मानता आम्ही महाविकास आघाडीच्या जागा म्हणूनच लढवणार आहे, महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगत आम्ही त्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. 


संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 


आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलोय. आमची सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड होते, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेनेकडून मी आणि विनायक राऊत, सीपीआय, सीपीएम देखील बैठकीली उपस्थित होते. लोकसभेच्या सर्व 48 जागांवर बैठक झाली आहे. 


मविआ पुढेच पाहणार आहे. काही लोकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र आम्ही 30 तारखेला पुन्हा बसू. आमची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना अधिकृत आमंत्रण दिलेलं आहे. सर्वच प्रमुखांशी त्यांची चर्चा झाली आहे आणि दिल्लीतील नेत्यांशी देखील चर्चा झाली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करु. त्यांची जी भूमिका तीच भूमिका आमचीदेखील आहे.


राजू शेट्टींशीदेखील चर्चा झाली आहे, 30 तारखेपर्यंत जागेसंदर्भात निश्चिती येईल. फॉर्म्युल्यावर जाऊ नका, शिवसेनेची जागा काँग्रेसची आहे एनसीपीची आहे .
एनसीपीची जागा काँग्रेस आणि एनसीपीची पण आहे. त्यामुळे एकत्रित आम्ही निवडणूक लढणार आहोत. आमच्यात सर्व आलबेल आहे. सर्वच घटक पक्षांशी चर्चा होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.


नाना पटोले काय म्हणाले? 


प्रकाश आंबेडकर यांचं समाधान झालंय . 30 तारखेला ते आमच्यासोबतच मिटिंगमध्ये येतील. त्यांचे प्रतिनिधी देखील असतील. आता त्यांचा जो गैरसमज होता तो दूर झाला आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.


जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, रमेश चिन्नाथलांनाही कनेक्ट केले


राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केला. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या समस्या मांडल्या तेव्हा जयंत पाटील यांनी AICC चे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नाथला यांनाही कॉलवर जोडले.


रमेश चिन्नाथला आणि जयंत पाटील या दोघांनीही नाना पटोले यांना MVA आणि INDIA मध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे मान्य केले. महाराष्ट्रासाठी निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत.


MVAआणि VBA या दोघांनी तात्पुरते 30 जानेवारीला मीटिंग ठरवली आहे; ओबीसी आरक्षण आणि गरीब मराठ्यांना आरक्षण हा अजेंडा असेल. पुढील बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा होईल.


वंचित आघाडी बैठकीला उपस्थित राहणार


दरम्यान, जागा वाटपासंदर्भात 30 तारखेला महाविकास आघाडीत चर्चा होणार आहे. या बैठकीला वंचित आघाडीकडून  आपले प्रतिनिधी पाठवले जाणार आहेत.
2019 च्या लोकसभेच्या ताकदीनुसार 7 टक्क्यांच्या जवळपास वोट शेअर होतं त्या तुलनेतच जागेची मागणी करणार असल्याचं वंचितने म्हटलं आहे. 


ही बातमी वाचा :