पालघर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विक्रमगड तालुक्यातील एका नामंकित शाळेत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. या शाळेतील 46 विद्यार्थी आणि 8 कर्मचारी असे एकूण 54 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप निंबालकर यांनी दिली. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि तालुक्याचे आरोग्य प्रशासन हादरले आहे. 


पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची  प्रकृती स्थिर असून, काही विद्यार्थ्यांना सौम्य लक्षणे आहेत.  तर काही विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. कोरोनाची लागण झालेल्या 46 विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थिनी आहेत. हे सर्व विद्यार्थी सातवी, नववी, दहावीतील आहे. सर्व विद्यार्थी 13 ते 16 वयोगटातील  आहेत. तर आठ शालेय कर्मचारी पॉझिटिव्ह  आले आहे. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  वैद्यकीय टीम देखरेखीसाठी तैनात करण्यात आली आहे. या सर्वांवर उपचार सुरु आहे,  असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


विक्रमगड तालुक्यातील एका नामंकित शाळेत करोनानं शिरकाव केल्याने तालुक्यात धास्ती वाढली आहे. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण 232 जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यापैकी या एकाच नामंकित शाळेतील 46 विद्यार्थी आणि 8 कर्मचारी असे एकूण 54 जण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांना सौम्य लक्षण आहेत. तर अनेकांमध्ये लक्षणे आढळून आलेली नाहीत. सर्व जण विलगीकरणात असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 
     
 मात्र, ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी बाधित होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने सर्वांनी अधिक काळजी आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :