‘लव्ह यू ऑल’, उदयनराजेंच्या पदाधिकाऱ्यांना हटके शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2018 08:11 PM (IST)
‘लव्ह यू ऑल’ म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेतील नवीन पदाधिकाऱ्यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लव्ह यू ऑल’ म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. उदयनराजेंनी सातारा पालिकेतील सभापती आणि विषय समित्यांच्या सदस्यांत खांदेपालट केली आहे. यावेळी नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांसोबत चर्चा करुन त्यांनी कामकाजाबाबत सूचनाही केल्या. पालिकेत उदयनराजे पदाधिकाऱ्यांशी गप्पा मारत होते. गप्पा मारुन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शुभेच्छा द्या, अशी मागणी केली. त्यानंतर ‘लव्ह यू ऑल’ म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पाहा व्हिडीओ :