एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/01/2018

  1. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत सरकारची काही धोरणं चुकली, साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांची खास मुलाखत, राजकारण्यांच्या साहित्य संमेलनातील हस्तक्षेपावरही बोट https://goo.gl/Szp6hC


 

  1. जर सत्य बोलणे म्हणजे बंडखोरी असेल, तर मी बंडखोर आहे, आमदार आशिष देशमुखांचा भाजपला घरचा आहेर, वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आत्मबळ यात्रा https://goo.gl/iR6MCw


 

  1. कर्जमाफीमुळे काहींच्या पोटात दुखतं, मग गेल्या 15 दिवसात बँकांना 80 हजार कोटी रुपये कसे दिले?, शरद पवारांचा सरकारला सवाल https://goo.gl/S168dJ


 

  1. फक्त बसमध्ये शिवशाही नको, तर कामही करा, उद्धव ठाकरेंच्या दिवाकर रावतेंना कानपिचक्या, मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेवरुन सरकारलाही टोला https://goo.gl/U5M7YU


 

  1. मुंबईत तीन ठिकाणी अग्नीतांडव, कांजुरमार्गच्या आगीत ऑडिओ रेकॉर्डिस्टचा मृत्यू, घाटकोपर आणि परळमध्येही आग https://goo.gl/zr59uq


 

  1. मुंबईत वांद्रे पूर्वेकडील गरीबनगरमध्ये आग लावणाऱ्या पिता-पुत्राला बेड्या, ऑक्टोबरमध्ये शंभरहून अधिक झोपड्या जळून खाक https://goo.gl/ZuW64x


 

  1. मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी उड्डाण पुलावर विचित्र अपघात, सात गाड्या एकामागोमाग धडकल्या, दोघे जखमी, गाड्यांचही मोठं नुकसान https://goo.gl/qqtbMw


 

  1. पिंपरीतल्या पवना धरणात फोटो काढणं जीवावर बेतलं, धरणाच्या पाण्यात उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू https://goo.gl/1TZrWB


 

  1. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी बडतर्फ पीएसआय युवराज कामटेची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, सीआयडीची मागणी https://goo.gl/L1kLZ2


 

  1. मुस्लिमांनी झिंगा खाणे टाळावे, हैदराबादची प्रमुख इस्लामिक संस्था 'जामिया निजामिया'चा फतवा, मात्र जमीयत-उलेमा-ए-हिंदचा फतव्याला तीव्र विरोध https://goo.gl/bHtq3Q


 

  1. ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पॅडमॅन आणि पद्मावती प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/HWH4f9


 

  1. दिल्ली-चंदीगढ महामार्गावर दाट धुक्यामुळे भीषण अपघात, दोन राष्ट्रीय खेळाडू गंभीर, तर चौघांचा जागीच मृत्यू https://goo.gl/u7CvKm


 

  1. अभिनेता सलमान खानला पंजाबच्या गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी, जोधपूर न्यायालयात हजेरीदरम्यानचा प्रकार, पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा https://goo.gl/UmdtJJ


 

  1. सचिन तेंडुलकरच्या मुलीला सतत फोनवरुन त्रास देणाऱ्या तरुणाला कोलकात्यात बेड्या, आरोपी देवकुमार मिद्दी सचिनच्या ऑफिसमध्ये बऱ्याचवेळा आल्याचंही उघड https://goo.gl/td6173


 

  1. केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळखंडोबा; दक्षिण आफ्रिकेचा कसोटीवर वरचष्मा, टीम इंडियासाठी कमबॅक आव्हानात्मक https://goo.gl/cYxJUz


 

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*