Lonavala Dam : लोणावळ्यामध्ये गेल्या आठवडा हा विक्रमी पावसाचा राहिला. अशात पर्यटकांची अपेक्षा ही पूर्ण झाली आणि वीकेंडच्या तोंडावर पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे हा निसर्ग धुक्यात हरवून गेला आहे. भुशी धरण ओसंडून वाहत आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांतून धबधबे खळखळत आहेत. परिणामी पर्यटकांनी हा परिसर फुलून गेलाय. येथे तुफान गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. अशात हौशी पर्यटकांकडून इथं नको ते उद्योगही केले जातात. अशा गर्दीत काही पर्यटक जायला मात्र, कचरत आहे. पण या गर्दी पर्यटकांची वाट लोणावळा लगतच मिनी भुशी डॅम पाहत आहे. या मिनी भुशी डॅमबाबत अनेकांना माहिती नाही.


लोणावळ्यातील 'मिनी भुशी डॅम'


लोणावळ्यातील भाजे लेणी परिसरात भुशी डॅम प्रमाणेच पायऱ्यांवरून खळखळत वाहणाऱ्या पाण्यात तुम्हाला आनंद लुटता येणार आहे. ज्या पर्यटकांना लोणावळ्यातील गर्दीतून सुटका करायची आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. लोणावळ्याच्या आजुबाजूला अनेक धबधबे आहेत. हा निसर्ग पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. त्यात सगळ्यात जास्त तरुणांचा समावेश असतो. अनेक नागरिकांच्या अतिउत्साहामुळे गर्दी होते आणि अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे गर्दी नसलेल्या ठिकाणी नागरिक पसंती देतात. त्यांच्यासाठी लोणावळ्यातील भाजे लेणी परिसरातील हा धबधबा अनेक पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.


वरंधा घाट बंद...


भोर-महाड मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शनिवार (22 जुलै) पासून  भोर- महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 22 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत भोर घाट अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. 


मढे घाट बंद...


वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील 60 दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहेत. हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये 200 ते 300 फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.


हेही वाचा-


Pune  PMPML News : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई; तब्बल 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन