सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी केली आहे. तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीत निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार असतील अशीही घोषणा नारायण राणेंनी केली आहे.


UNCUT | महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांची पत्रकार परिषद | सिंधुदुर्ग | एबीपी माझा



नारायण राणेंनी शिवसेना-भाजपवरही आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेना-भाजपची युती मनापासून झालेली नाही. तसेच युतीत मनोमिलनही झालेलं नाही. शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते नाराज असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अर्जुन खोतकर या असंतोषाचा उदाहरण आहे. याचा फायदा इतर पक्षांना आगामी निवडणुकीत होईल.


लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार असल्याची भूमिकाही नारायण राणेंनी स्पष्ट केली. निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप गटाला मतदान करणार असल्याचंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं.