मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मातोश्रीवर लोकसभा निवडणुकांसाठी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या निवडणुकांची तयारी देखील ठाकरे गटाकडून करण्यात येईल. याच निवडणुकांवर सविस्तर चर्चेसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. 


दरम्यान लोकसभेच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे जोमाने तयारीला लागालया हवं आणि त्यानुसार बैठकांचं नियोजन व्हायला हवं, अशी चर्चा या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे गटही आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलं असल्याचं पाहायला मिळतंय. 


उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा 


लोकसभा निवडणुकांची तयारीसाठी सगळेच पक्ष मैदानात असल्याचं चित्र आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात दिवळीनंतर होणार असून ठाकरे गटाकडून या सभांचे नियोजन करण्यात येईल. या बैठकीला खासदार संजय राऊत,  विनायक राऊत,  अनिल देसाई,  अरविंद सावंत,  चंद्रकांत खैरे,  राजन विचारे,  अनिल परब,  रवींद्र वायकर,  सुभाष देसाई हे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. 


राज्यातील सत्तासंघर्षानंतर लोकसभा निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु करण्यात आलीये. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम चांगलाच रंगणार असल्याचं चित्र आहे.  


हेही वाचा : 


मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या सीमावर्ती भागात दारूबंदी, पोलिसांचा कडक पाहारा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू