Sharad Ponkshe : महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे. प्रत्येक गावात असे विद्यालय हवे, तसेच सावरकर यांच्यावर कार्यक्रम व्हायला हवेत, असे मत अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी व्यक्त केलं.
 सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे असेही ते म्हणाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात 'मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर' नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोंक्षे बोलत होते. रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात. ही मुलं बघा अन दिल्लीतला पण मुलगा बघा. या मुलांना कळतंय आणि एवढे मोठे झाले तरी त्यांना अजून गोळवलकर बोलता येत नाही, असे म्हणत पोंक्षे यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 


सावरकर कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे असेही ते म्हणाले. माझे खूप जवळचे स्नेही एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. महाराष्ट्रातील शाळेत हे कार्यक्रम झाले पाहिजेत. दोन बस घेऊन प्रयोग झाले पाहिजेत असेही शरद पोंक्षे म्हणाले. इथं असणारे सगळे सावरकर प्रेमी आहोत. जिथं अनेक शाळेत सावरकरांचा फोटो लावला जात नाही आणि धडा देखील शिकवला जात नाही. तिथे भलतंच शिकवलं जातं, असा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाला थ्रू करायला लावू. यातील अनेक मुलं भविष्य असल्याचे पोंक्षे यावेळी म्हणाले.


सावरकर यांचे मोठेपण मान्य करणे म्हणजे काही जणांना राजकीय तोटा वाटतो. सावरकर यांच्यावर बोलणारे आणि आक्षेप घेणारे जास्त आहेत असेही पोंक्षे म्हणाले. ते कितीही बोलले तरी दुर्लक्ष करा असेही ते म्हणाले. आता कोणी या कार्यक्रमाला आले न आले, राजकिय व्यक्ती नाही आल्या तरी काही फरक पडत नाही. मनापासून प्रेम करणारी माणसं हवीत असेही पोंक्षे यावेळी म्हणाले. आता एवढ्या कार्यक्रमापुरते थांबू नका. सावरकर फार मोठा माणूस होऊन गेले. मात्र एवढ्या मोठ्या देशभक्तांचा जेवढा अपमान केला तो आतापर्यंत कोणाचाच झालं नसेल असेही पोंक्षे म्हणाले. सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे, यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे असेही ते म्हणाले. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती, काँग्रेसला पण आहे अन ती दहशत आणखी वाढली पाहिजे असेही शरद पोंक्षे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: