Shrikant Shinde in Aurangabad : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या (Lok Sabha-Assembly Elections) अनुषंगाने सर्वच पक्षाचे नेतेमंडळी कामाला लागली आहे. तर अनेक नेते आता वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) देखील आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पक्षवाढीसाठी श्रीकांत यांनी आता दौरे सुरु केले असून, त्यांनी रविवारी (6 ऑगस्ट) औरंगाबाद (Aurangabad)  जिल्ह्याचा दौरा केला आहे. तर पुढे त्यांच्याकडून जालना आणि बीडचा देखील दौरा करण्यात येत आहे. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचाशी संवाद साधला. 


मुख्यमंत्री पुत्र तथा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुद्धा केल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, "पक्ष संघटनेचे काम कशाप्रकारे सुरु आहे हे पाहण्यासाठी हा दौरा आहे. तसेच या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. येणाऱ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करतोय यात शंका नाही. तसेच प्रत्येक जिल्ह्यात आम्ही निरीक्षक पाठवले आहे, त्यात पक्षाची स्थिती सुद्धा पाहतोय." 


दरम्यान पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, "पक्षाचे जुने नेते आमच्यासोबत असून, ती आमची ताकद आहे. विरोधक फक्त आमच्यावर आरोप करतात, मात्र आम्हाला मिळणार प्रतिसाद बघा, यातून आमची ताकत दिसत आहे. राज्यातील सरकार चांगलं काम करतंय, म्हणून लोक येतायत हे सत्य आहे. तसेच, काम झालं पाहिजे म्हणून तर लोक येणार ना, लोकांना विकास हवाय. नीलम ताई आल्या, कायंदे ताई आल्या, अनेकजण आमच्या सोबत येतायत. सगळ्यांना शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे. तर, तीन पक्षांचे सरकार आहे, कुणाची पीछेहाट नाही. त्यामुळे हे सरकार मजबूत आहे." 


कल्याण-औरंगाबाद मतदारसंघाचा निर्णय वरिष्ठ घेतील...


"आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणूक आहेच. मात्र, शिवसेनेचे 13 खासदार आमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी पक्ष देखील आमच्यासोबत आहे. भाजपकडून माझ्या कल्याण मतदारसंघ अथवा औरंगाबाद लोकसभेची तयारी सुरु असली तरी त्याची चिंता तुम्ही करु नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे एकत्र बसून जागा वाटपावर निर्णय घेतील," असे श्रीकांत शिंदे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


CM Eknath Shinde : आम्हाला 50 खोके, गद्दार म्हणता...सोक्षमोक्ष लावतो; CM शिंदेंनी ठाकरे गटाचे ते पत्र समोर आणले