Maharashtra LIVE Updates: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची शासनास दखल घेण्यास सांगावे, बजरंग सोनवणे यांचं राज्यपालांना पत्र
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Beed Loksabha : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी पंकजा मुंडे यांचा जवळपास साडेसहा हजार मतांनी निसटता पराभव केला. त्यानंतर 36 बीडमधील चिंचेवाडी येथे 36 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही दोन तरुणांनी मुंडे यांचा पराभव झाल्याने जीवन संपवले होते. दरम्यान, गावातील लोकांचा आणि नातेवाईकांचे असं म्हणणं आहे की, याबाबतीत कोणतीही चिठ्ठी अथवा ठोस पुरावा नाही.
Omprakash Rajenimbalkar Meets Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे अनेक खासदार आमदार त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्याचं आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, आता धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) आणि आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
Omprakash Rajenimbalkar Meets Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे अनेक खासदार आमदार त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्याचं आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, आता धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) आणि आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणारं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- आज पक्षाचा वतीने राज्यसभेच्या उमेदवाराचा नावाची घोषणा करण्यात येणार
- राज्यभरातील आमदारांच अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांना खासदार करा यासाठी पत्र
- सुनील तटकरे आज उमेदवाराची दुपारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषणा करणार
Dombivli MIDC Fire: डोंबिवलीत एमआयडीसीत भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
- कंपनीत कोणीही नसल्याची अग्निशमन दलाकडून माहिती
- दोन तासांनी आगीवर नियंत्रण
- इंडो अमाईन्स केमिकल कंपनीला लागली होती आग
Dombivli MIDC Fire LIVE: डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स (IndoMines) कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. कंपनीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट झाली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Buldhana News: सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखीचं शेगाव येथून पंढरपूर साठी प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थानाची तयारी संत गजानन महाराज संस्थानाने पूर्ण केली असून यंदा दिंडीचे हे 55वं वर्ष आहे. जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं उद्या प्रस्थान होणार आहे. या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी उद्या सकाळी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. तर पुढील एक महिना दोन दिवस पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत. आषाढी सोहळा संपल्यावर पालखी 24 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून 11 ऑगस्ट रोजी शेगावात पोहचेल.
उद्या या पालखी प्रस्थान सोहळ्याला नवं नियुक्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे उपस्थित राहणार आहे .गण गण गणात बोते च्या गजरात व हजारो भक्तांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा रंगणार आहे
Maharashtra Politcs: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यसभेसाठी दोन जागा मिळाल्या आहेत या दोन पैकी एका जागेची निवडणूक 26 जूनला पार पडणार आहे यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 जून आहे. या जागेसाठी पार्थ पवार सुनेत्रा पवार छगन भुजबळ यांच्या नावांची चर्चा आहे सध्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे पक्षात नाराजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसांपासून सातत्याने छगन भुजबळ महायुतीला अडचण ठरेल असे सवाल उपस्थित करून कुठेतरी राज्यसभा पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर दबाव निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. दुसरीकडे पार्थ पवार यांना देखील अजित पवार यांच्याकडे स्वतःला उमेदवारी मिळावी यासाठी सातत्याने दबाव निर्माण केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर कुटुंब की पक्ष हा सवाल निर्माण झाला आहे.
Solapur News: दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढ्याच्या पाण्यात तिघे वाहून गेले, दोघे बचावले, एक जण बेपत्ता
पाण्याबरोबर वाहून जात असताना प्रवाहातील झाडांना पकडून दोघांना स्वतःला वाचविण्यात यश, तर एक जण अद्याप बेपत्ता
ज्ञानेश्वर कदम असे पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव, प्रशासनाकडून अद्याप शोध घेण्याचे काम सुरु
बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी हे दोघे बचवाले
सोलापुरात सुरु असलेल्या पावसामुळे कासेगाव ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आहे
मध्यरात्त्री पाणी पुलावरून वाहत असताना तिघांनी दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला
यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे वाहून गेले
Mumbai News: मुलुंड येथे राहणारे बबन भालेराव हे आपल्या कुटुंबासोबत अहमदनगर येथील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी या गावात शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे आणण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत स्वतः च्या रिक्षाने जात असताना माळशेज घाटातील बोगद्याजवळ रिक्षावर दगड कोसळला रिक्षाच्या मागच्या सीटवर बसलेल्या बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला सचिन बबन भालेराव वय वर्षे 40 तर स्वयम सचिन भालेराव वय वर्षे 7 या बाप लेकाचा जागीच मृत्यू झालाय.
विशेष म्हणजे मयत सचिन यांचे वडील बबन हे रिक्षा चालवत होते वाडीलांसमोरच नातू आणि लेकाचा मृत्यू झाला आहे. रिक्षा चालक बबन यांच्या पत्नी विमल जखमी झाल्या आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास टपरी चालकाला किरकोळ वादातून चाकूने साफसफ वार करत खून केल्याची घटना घडली. रत्यावर पडलेला रक्ताचे थारोळे बघून नागरिकही भयभीत झाले. या घटनेत सुनील राठोड वय 42 रा. रांजणगाव शेपू, यांचा मृत्यू झाला.
सुनील राठोड असं पानटपरीचालकांच नाव आहे. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी शिवा दुधमोगरे, पवन दुधमोगरे या दोन्ही भावंडांनी टपरीचालक सुनील राठोड सोबत पैसे न देण्यावरून वाद घातला. नंतर चाकूने वार करत खून केला..
Pune Rain Updates : चाकणमधील खराबवाडी येथे घराच्या छतावर वीजेचा शॉक लागुन मायलेकाची जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडलीय. घराच्या छतावर आईसोबत 15वर्षीय मुलगा छतावर आला असताना बाजुला असणा-या पत्र्याला विद्युत लाईट प्रवाह उतराला यावेळी मुलाला शॉक लागल्याने आई बचावासाठी गेली असताना आईलाही शॉक लागला यामध्ये 15 वर्षीय मुलासह आईचा शॉक लागुन मृत्यु झाल्याने चाकण खराबवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पल्लवी जातु,समर्थ जाजु असे मायलेकांची नावे आहे
Buldhana News: बुलढाण्याचे खा. प्रतापराव जाधव हे आता केंद्रात राज्यमंत्री झालेत.. मात्र बुलढाण्यातील कार्यकर्त्यांना व आमदारांना प्रतापराव जाधव हे कॅबिनेट मंत्री होतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा काहीसा अपेक्षा भंग झाला. आता उद्या सकाळी प्रतापराव राज्यमंत्री पदाचा प्रभार सांभाळून पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहे. उद्या प्रतापराव जाधव हे दिल्लीतून थेट संत नगरी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे उद्याच संत गजानन महाराजांची पालखीच पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे . त्यामुळे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्वागतासाठी शेगाव शहरात कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केली आहे . बॅनरवर प्रतापरावांचा उल्लेख हा राज्यमंत्री नसून "कॅबिनेट मंत्री" असा करण्यात आला आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Jalna News: उपोषणाच्या पाचव्या दिवशी पहाटे अडीच वाजता वाजता आज मनोज जरांगे यांनी उपचार घेतले, रात्री बर्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची देखील विनंती केली, यावेळी ग्रामस्थ आणि डॉक्टरांच्या पथकाने विनंती केल्यावर मनोज जरांगे यांनी सलाईन लावण्यास परवानगी दिली.
Mumbai Monsoon Rain Alert: मुंबई महानगर प्रदेशात मान्सून सुरु झाला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांत दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तसंच धरणांमध्ये गेल्या तीन वर्षांत सर्वात नीच्चांकी म्हणजेच 5.64 टक्के पाणी शिल्लक होतं. यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलीये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी अशा सातही धरणांत मिळून 5.64 टक्के पाणीसाठा आहे. गेले दोन-तीन दिवस मुंबईत रात्री चांगलाच पाऊस पडला असून काही भागांत पाणीही साचले. मात्र धरणे असलेल्या शहापूर तालुक्यात अगदीच तुरळक पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
Maharashtra Rain Alert: आज राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर विदर्भ तसेच मराठवड्यातील काही भागात मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारीही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल भरत असताना फोनवर बोलणं एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं. पेट्रोल भरायला हा तरुण गाडीवरुन उतरलेला असताना त्याच्या बाईकनं अचानक पेट घेतला. त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं आणि ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर करू नका, असे फलक असूनही अनेक जण हा नियम पाळत नाहीत. पेट्रोल पंपवर असताना फोन करू अथवा घेऊ नका असं आवाहन एबीपी माझा आपल्या प्रेक्षकांना करतंय.
Buldhana Samruddhi Expressway News: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ बेकायदेशीररित्या पार्क केलेली वाहनं एबीपी माझानं दाखवली. त्यानंतर बुलढाणा परिवहन विभागाला जाग आली, आणि मग कारवाई सुरू झाली. आज रात्रभर ही कारवाई सुरू राहणार आहे. बुलढाणा परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद गाजरे आणि विवेक भंडारे हे स्वतः समृद्धी महामार्गावर उपस्थित आहेत. समृद्धी महामार्गावर ताशी १२० किमी एवढी वेगमर्यादा आहे. त्यामुळे तिथं बेकायदेशीररित्या गाड्या पार्क करणं अतिशय धोक्याचं आहे. हे सगळं माहीत असूनही परिवहन विभागाला जाग येण्यासाठी त्याची बातमी टीव्हीवर दाखवावी लागते, हे दुर्दैव.
Navi Mumbai News: कुख्यात गँगस्टर अबू सालेमला नवी मुंबईतील तळोजा जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याविरोधात सालेमनं कोर्टात अर्ज केला आहे. मला तळोजा जेलमध्येच राहू द्या, अन्य जेलमध्ये माझ्या जीवाला धोका आहे, असा दावा अबू सालेमनं आपल्या अर्जात केला आहे.
Maharashtra Rain Updates: राज्यात मान्सूनची दमदार एण्ट्री झालेय. तर कोकणासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली...नाशिकच्या मालेगावातील अजंग - वडेलला ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतातून पावसाचे पाणी नदीसारखे वाहत आहे. तर नाशिकच्या चांदवडमध्येही मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्ष बागेला नदीचे स्वरूप आले. दुसरीकडे अहमदनगरमधील संगमनेरमध्ये जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी.
Maharashtra Politics : अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही लोकसभेतल्या पराभवाचं खापर संविधान बदलाच्या प्रचारावर फोडलंय.
संविधान बदलण्यात येणार हा विरोधकांचा प्रचार लोकांनी डोक्यात ठेवला. 400 पारच्या नाऱ्यामुळंही गडबड झाली असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. नाशिक लोकसभेत कांद्याच्या प्रश्नामुळं तर मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनच्या दराचा फटका बसल्याचंही शिंदे म्हणाले.
Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांच्या महायुतीतल्या एन्ट्रीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय. 20 तारखेच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याचंही शिरसाट म्हणालेत.
MNS Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या खांद्याला खांदा लावून मनसेचे कार्यकर्तेही जोमाने मैदानात उतरले होते. मात्र केंद्रात भाजपचं सरकार स्थापन झालं आणि नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी शपथ घेतल्या. आणि याच सोहळ्यात राज ठाकरे शोधूनही दिसले नाहीत. त्यामुळे आता वेगळीच चर्चा रंगल्याचं दिसतंय.
Vidhan Parishad LIVE Updates: विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपलीय. ठाकरे गटानं जाहीर केलेले विधानपरिषदेचे चारही उमेदवार आमच्याशी चर्चा न करता जाहीर केल्याचा आरोप पटोलेंनी केलाय. नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधरचे उमेदवार मागे घ्या, असा निरोपही त्यांनी ठाकरेंकडे पाठवलाय. पण यावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी पटोलेंची खिल्ली उडवली.. पटोलेंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील असं आदित्य ठाकरे म्हणालेत. पण उद्धव ठाकरेंनी माझ्याशी संपर्क साधला असून उद्यापर्यंत यावर तोडगा निघेल असं पटोले म्हणालेत.
पार्श्वभूमी
Maharashtra LIVE Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांपासून अन्न पाणी घेतलेलं नाही जर त्यांच्या जीवितस काही झालं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्य शासनाला तात्काळ आंदोलनाची दखल घेण्यास सांगावं, अशी विनंती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -