Lok Sabha Election Code Conduct : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) कोणत्याही क्षणी आचारसंहिता (Code Conduct) जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्य सरकारकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचा धडाका सुरू असल्याचा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय (Government Decision) घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) वेगवेगळ्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहत नारळ फोडताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आज सकाळी 11 वाजता मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या पोस्टल रोडचा उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 


पुढील दोन-तीन दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक विकाकामाचे उद्घाटन होतांना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक विकाकामाचे लोकार्पण करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे मुंबईत देखील अशाच विकासकामाचे उद्घाटन सोहळे होतांना पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विकासकामांचे उद्घाटन केल्यास त्याच प्रचारासाठी देखील फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या आधी असे उद्घाटन सोहळे पाहायला मिळतात. 


पोस्टल रोडचे उद्घाटन 


मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या पोस्टल रोडचे देखील आज उद्घाटन करण्यात येणार आहे. तब्बल 14 हजार कोटी खर्च करून करण्यात आलेल्या नऊ किलोमीटरच्या या मार्गामध्ये दोन जुळे बोगदे आकर्षण असणार आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा 40 ते 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सकाळी आठ ते रात्री आठ हा मार्ग सुरू असणार आहे. उर्वरित वेळेत दुसऱ्या मार्केटचे काम सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते या पोस्टल रोडचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 


फडणवीसांकडून दिवसभरात अनेक विकास कामांचे उद्घाटन...



  • मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाचे वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका अंशतः खुली करणे

  • शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) येथील इमारतीतील लॉटरी पध्दतीने वाटप केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी प्रतिकात्मक स्वरुपात 10 कर्मचाऱ्यांना सदनिकच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम

  • खाजगी कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या थेट पणनच्या व्यापार विषयक कार्यपध्दतीबाबत अभ्यास गट यांचेसमवेत भेट

  • महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित यांच्या विविध उपक्रमाचे भूमीपूजन 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Coastal Road Inaugurated: कोस्टल रोडचं आज उद्घाटन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, ठाकरे गटालाही आमंत्रण