Nagpur Lok Sabha Election 2024: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील (Vidarbha) पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. या पाचही मतदासंघातील एकूण 97 उमेदवार रिंगनाणात होते. तर या साऱ्यांना आता 4 जून म्हणजेच तब्बल 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दुसरकडे उपराजधानीत (Nagpur) मतदानात झालेली घट ही एक चिंतेचे बाब मानली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि सर्व स्थरातील यंत्रणा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक कसोशीचे प्रयत्न केलेत. त्यात अगदी विक्रमी उपक्रमही घेतले. मात्र, 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. अशातच मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण लक्षात घेऊन दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी (Pm Narendra Modi) भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत विचारणा केली आहे.


उपराजधानीत मतदानाचा टक्का का घटला? 


विदर्भात (Vidharbha) दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर होते. महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 19 एप्रिलला वर्ध्यात (Wardha Lok Sabha) भव्य सभा पार पडली. वर्धा आणि अमरावती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत देखील पंतप्रधानांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ही सभा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील राजभवनात मुक्काम केला. यावेळी त्यांना भेटायला आलेल्या भाजप मधील पदाधिकाऱ्यांना मोदींनी जाब विचारत मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर का पडले नाहीत, असा सवाल केला. हाती आलेल्या आकडेवारीनुसार नागपूर लोकसभा मतदारसंघात 54.33 टक्के मतदान झाले आहे. तर 45. 67 टक्के मतदार हे आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत. परिणामी, याबत पंतप्रधान मोदींनी निराशा व्यक्त करत भाजपमधील पदाधिकाऱ्यांची विचारणा केली आहे.  


 किती टक्के झाले मतदान? 


उपराजधानी नागपूर मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपच्या या दिग्गज नेत्याच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नागपुरात एकूण 54.33 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे पूर्व विदर्भात 55.76 टक्के मतदान झाले आहे. तर दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये 53.03 टक्के , दक्षिण नागपूरमध्ये 52.80 टक्के मतदान, पूर्व नागपूरमध्ये 55.76 टक्के मतदान, मध्य नागपूर मध्ये 54.02, पश्चिम नागपूरमध्ये 53.71 टक्के मतदान, उत्तर नागपूरमध्ये 55.16 टक्के मतदान, असे एकूण  54.33 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. त्यामुळे आता नागपुरकरांचा कौल नेमका कोणाला असणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या