Vidarbha Rain Update: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. परंतु या मतदानावर अवकाळी पावसाचं सावट आहे. अमरावती शहराच्या काही भागात रिमझिम अवकाळी पाऊस सुरु आहे. तर अकोल्यात जिल्ह्यासह शहरात पहाटेच्या (Maharashtra Rain Update) सुमारास तुरळक पाऊस झाला. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर कायम होता. बुलढाणा, खामगाव, मोताळा, नांदुरा शेगाव या तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरुच होता. सकाळीही पावसाने हजेरी लावली आहे.
हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती , अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बुलढाण्यात वादळी पावसाची रात्रभर अनेक तालुक्यात हजेरी
बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने रात्रभर अनेक तालुक्यात हजेरी लावली आहे. बुलढाण्यातील खामगाव, मोताळा, नांदुरा, शेगाव या तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरूच होता सकाळीही या पावसाने हजेरी लावली आहे.तर अकोल्यात पहाटेच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात तुरळक पाऊस झालाय.
मतदानावर परिणाम होण्याची शक्यता
पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. आजही तालुक्यात ढगाळ वातावरण असून पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काल विदर्भातील अनेक भागात पावसाने झोडपले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज जर असाच पाऊस असला, तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
हे ही वाचा :