Lok Sabha Election Opinion Poll 2024 : लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात (Maharashtra) महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या ओपिनियन (ABP & C-Voter Survey ) पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे.  तर महाविकास आघाडीच्या (maha vikas Aghadi) पारड्यात 26 ते 28 जागा पडण्याचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसं यश मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार, असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37 टक्के तर महाविकास आघाडीला 41 टक्के मतं मिळू शकतात. 


देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जवळ आल्या आहेत. तीन ते चार महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप (BJP) आणि काँग्रेससह (Congress) देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यादरम्यान सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलेय. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कोणाचा विजय किंवा पराभव झाला असता असा प्रश्न विचारण्यात आला. देशातील पाच मोठ्या राज्यांतील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश करून लोकसभेच्या एकूण 223 जागा आहेत. या जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार हे ठरते. महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


महाविकास आघाडीला फायदा - 


महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसतोय. आज जर महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली असती तर भाजप+ आघाडीला 19 ते 21 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्र पक्षाला 26 ते 28 जागा मिळतील. तर इतरांना 0-2 जागा मिळतील असा अंदाज आहे.   तर, मतांच्या टक्केवारीनुसार, भाजप आघाडीला 37 टक्के, काँग्रेस आणि मित्रपक्षाला 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.


महाराष्ट्रात ओपिनियन पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा ?


स्रोत- सी वोटर
एकूण जागा - 48
भाजप + 19-21
काँग्रेस  + 26-28
इतर - 0-2


महाराष्ट्रात कुणाला किती मतं ?
स्रोत- सी वोटर
एकूण जागा - 48
भाजपा + 37%
काँग्रेस + 41%
इतर - 22%



टीप- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील  लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.


आणखी वाचा :


अब की बार पीएम मोदींच्या कामगिरीवर जनता किती समाधानी? ओपिनियन पोलमधून धक्कादायक खुलासा