Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये (Mumbai North West Lok Sabha Constituency) उमेदवारी जाहीर करणे हे महाविकास आघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा भेटीमध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांची या लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी टीका केली असून, अमोल कीर्तीकर यांच्याच उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. 


याबाबत ट्वीट करत, "अमोल कीर्तीकर यांची खिचडी घोटाळ्या प्रकरणांमध्ये ईडी कडून चौकशी सुरू असताना,  अशा चौकशी सुरू असणाऱ्या उमेदवाराचा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचार करणार का? असा सवाल निरुपम यांनी ट्विट करून विचारला आहे. संजय निरुपम उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. त्यांनी तशा प्रकारचं स्पष्टीकरण याआधी दिले असून काँग्रेस नेत्यांना सुद्धा या संदर्भात कळवलेला आहे. अशात उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने संजय निरुपम समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. 


अंतिम निर्णय झाला नसतांना घोषणा? 


महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात चर्चा अजूनही सुरू आहेत आणि यामध्ये आठ नऊ जागांचा जो तिढा आहे, त्या जागांमध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा असल्याचं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या जागेवर निर्णय झालेला नसताना शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी कशी जाहीर केली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये विचारला आहे. या संदर्भात त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस नेतृत्वाला उमेदवारी संदर्भात प्रश्न विचारले आहेत. 






उद्धव ठाकरेंकडून थेट घोषणा...


महाविकास आघाडीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाबाबत अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. तसेच, कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असतांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आली आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शाखा भेटी दरम्यान, 'अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचा आहे,' असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी: शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंचीही घोषणा, मुंबईतील उमेदवार जाहीर!