नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत जसजशी कमी होत आहे, तशा दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. देशातील लॉकडाऊन उठवण्याबाबतचा निर्णय येत्या 11 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी 11 एप्रिलला सकाळी 11 वाजता चर्चा करणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बोलावलेली ही दुसरी बैठक आहे. लॉकडाऊनची मुदत संपण्याच्या तीन दिवस आधी ही बैठक होत आहे. त्यामुळे बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊनबाबत मतं जाणून घेतली जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात प्रत्येकी राज्याची काय तयारी आहे किंवा लॉकडाऊन सुरु ठेवण्याबाबत काय वाटतं, याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांशई मोदी चर्चा करणार आहेत. आठवडाभरापूर्वी 2 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केला होती.


केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना स्वस्त धान्यांना पुरवठा केला जात आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चो होण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक कशी सुरु करावी याबाबत चर्चाही या बैठकीत होऊ शकते.


नरेंद्र मोदींची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं जवळपास सर्वच विरोधी पक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या काही सूचना मिळत आहेत, त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने झुकतं माप आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


संबंधित बातम्या


Lockdown | लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर केंद्र स्तरावर मंथन सुरु





Coronavirus Update | काय आहे केंद्राचा कोरोनासंदर्भातील मास्टर प्लॅन?