सांगली : सांगलीतील काही सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणांनी होम क्वॉरन्टाईन व्यक्तींसाठी 'Covid-19 Fighters Sangli" हे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून होम क्वॉरन्टाईन व्यक्तींवर नजर ठेवता येणार आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून निर्मिती केलेले हे अॅप सांगली प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वॉरन्टाईन केलेले अनेक जण बाहेर फिरताना दिसले. तसंच या व्यक्तींमुळे अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे होम क्वॉरन्टाईनबाबत प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. मात्र तरीही होम क्वॉरन्टाईन व्यक्तींवर करडी नजर ठेवणं हे मुश्किलच आहे. हीच बाब ओळखून सांगलीतल्या काही सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी मार्ग शोधला आहे.


खासदार संजयकाका पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील होम क्वॉरन्टाईन केलेल्या नागरिकांसाठी जिओट्रॅकिंग आणि जिओफेसिंग यंत्रणा वापरुन 'Covid-19 Fighters Sangli' हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. दीपक इंगवले आणि त्याच्या मित्रांनी मिळून हे अॅप बनवले आहे.


काय आहे 'Covid-19 Fighters Sangli' अॅप?


- स्मार्ट फोन आणि अँड्रॉईड बेस मोबाईल बेस अॅप
- प्रत्येक होम क्वॉरन्टाईन व्यक्तीवर दहा मिनिटांच्या हालचालीची नोंद.
- एक तासाचे रिमाईन्डिंग सेटिंग, सेल्फ फेसिंग अटेंडन्स.
- घराच्या आकारानुसार अंतरची सीमा .
- अंतराची ओलांडल्यास तातडीने पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला अलर्ट .
- SOS सिस्टममुळे होम क्वॉरन्टाईन व्यक्तीला लक्षण आढळल्यास आरोग्य यंत्रणेला कळण्याची सोय.


अशी अनेक वैशिष्ट्ये 'Covid-19 Fighters Sangli' या अॅपमध्ये विकसित करण्यात आली आहेत. ज्यामुळे प्राशसनाला आता होम क्वॉरन्टाईन व्यक्तींच्या घरापर्यंत जाऊन वेळ घालवावा लागणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.