मुंबई :  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. मुंबईसह वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार आजपासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश सोमवारी (31 मे) काढण्यात आला आहे. 


मुंबईत काय सुरु, काय बंद?



  • आवश्यकतेतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत उघडी राहतील. पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार उघडी राहतील. तर रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील. पुढील आडवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार उघडी राहतील व रस्त्याच्या उजवीकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील. शनिवार व रविवारी आवश्यकतेतर दुकाने पूर्णत: बंद राहतील.

  • ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंबरोबर आवश्यकतेतर वस्तूंचे वितरण करण्यास परवानगी असेल.

  • राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले 'ब्रेक-द-चेन' बाबतचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

  • शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.


औरंगाबादमध्ये काय सुरु, काय बंद?



  • 16 एप्रिल आणि 12 मे 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेमधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

  • औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील.

  • औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.  सर्व शॉपिंग सेंटर/मॉल मात्र बंद राहतील.

  •  रेस्टॉरंट/हॉटेल, बार- मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021  रोजीच्या आदेशानुसार सुरु राहतील. औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तु- सेवा तसंच, अत्यावश्यक व्यतिरिक्त यांची घरपोच सेवा सुरु करण्यासही मुभा राहिल.

  • औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात दररोज दुपारी 3.00 वाजल्यानंतर वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक कारण अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) राहिल. तसेच, घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी राहिल. 

  • औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक /कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयाव्यतिरिक्त ) 25% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.

  • कृषी संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

  • माल वाहतूक व मालाचा पुरवठा संबधीत दुकानदार/आस्थापनेस करण्याकरिता वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत मात्र अशा दुकानदार/आस्थापना यांनी कोणत्याही परिस्थितीत माल साठवणूक करताना या कालावधीत मालाची विक्री करु नये, मालाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


वाशिम जिल्ह्यात काय सुरु काय बंद?



  • सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार

  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद

  • हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा

  • पेट्रोल डिझेल सेवा 2 वाजेपर्यंत सुरु

  • अत्यावश्यक सेवा कृषी  सेवा वाहन 24 तास सुरु


सांगली काय सुरु काय बंद?



  • अत्यावश्यक सेवेमधील सर्व किराणा दुकाने, फळं आणि दूध, बेकरी ,खाद्य आणि मटण दुकान 7 ते 11 सुरू राहणार

  • भाजी मंडई हे सकाळी 7 ते 11 सुरू राहतील मात्र आठवडा बाजार बंद राहतील.

  • 2 जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी  7 ते 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी 


यवतमाळ काय सुरु काय बंद?



  •  जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने 2 जूनपासून  सकाळी 7 ते  दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु

  • केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरु

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद 


नंदुरबार काय सुरु काय बंद?



  •  सर्वच व्यापारी आस्थापना दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार

  •  कृषी संदर्भातील आस्थापना 6 वाजेपर्यंत सुरु राहणार 

  • रात्रीची संचारबंदी कायम 


अकोला जिल्ह्यात काय सुरु काय बंद?



  • सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं, पेट्रोलपंप सुरु राहतील

  • बँका 10  ते 3 या वेळेत सुरू 


रत्नागिरी जिलह्यात काय सुरु काय बंद?



  • दूध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत पुरविता येईल.

  • रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा अन्य जिल्हयातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस बंद करणेत येत आहेत.

  • केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी वैदयकिय उपचारासाठी किंवा निकडीच्या 1 आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हयात प्रवेश करणेस किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील.

  • जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोविड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही

  • मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. 

  • शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या काळात सुरु ठेवणेस मुभा 


पिंपरी चिंचवड 1 जून ते 10 जूनसाठी नवी नियमावली काय सुरु काय बंद?



  • अत्यावश्यक दुकानांशिवाय इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू

  • सर्व बँका खुल्या असणार

  • हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा

  • मद्यविक्रीची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 खुली राहणार 

  • ई कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांची घरपोच सेवा करण्याची मुभा

  • दुपारी 3 नंतर अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही

  • कृषी संबंधित दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू


परभणीत काय सुरु काय बंद?



  • किराणा,भाजीपाला,फळ विक्रेत्यांना सकाळी  7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुभा

  • शनिवार व रविवार सर्व  बंद

  • शेती संबंधित निगडीत सर्व दुकाने, बाजार समिती, मोंढा, आडत बाजार यांना आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 7 ते  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी



कल्याण-डोंबिवली काय सुरु काय बंद?



  • सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू

  • अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल.

  • दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध 

  •  कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू 

  • कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू 

  • दुपारी 2 नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा 

  • दुपारी 2 नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही

  • अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने ( मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू 

  • अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार