मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यात 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील 130 जिल्हे रेड, 284 जिल्हे ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहे. देशातील सर्व मोठी शहरे रेड झोनमध्ये आहेत.


देशातील झोननिहाय शहरे :


रेड झोन : मुंबई, पुणे, दिल्ली, पटना, चंदीगढ, सूरत, अहमदाबाद, फरीदाबाद, श्रीनगर, रांची बंगळूरू, भोपाळ, इंदोर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, आग्रा, लखनौ, नोएडा, कोलकाता


ऑरेंज झोन : गोरखपूर, उदयपूर, भीलवाडा, पठाणकोट, कोरापुट, गुरूग्राम, राजकोट, सिवान आणि तिरुचरापल्ली


ग्रीन झोन : अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मिझोरम, शिमला, रेवाडी, पोरबंदर, मुजफ्फरपूर, गोवा आणि सिक्किम



काय सुरु होणार? काय बंद राहणार?


रेड झोन




  • बस, रिक्षा, टॅक्सी बंद राहणार

  • सलून बंद राहणार

  • ग्रामीण भागातील सर्व दुकाने नियम पाळून खुली करण्याचा निर्णय

  • मात्र ग्रामीण भागातील मॉल सुरू होणार नाही

  • रेड झोनमधील महापालिका क्षेत्र मुंबई, MMR, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव वगळून इतर शहरांमधील सर्व प्रकारची दुकान सुरू होणार

  • वरील महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार

  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार
    त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित


ऑरेंज झोन




  • बस वाहतूक बंद राहणार

  • टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू होणार

  • एक वाहक आणि दोन प्रवासी अशी परवानगी

  • खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार

  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार

  • त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित

  • अत्यावश्यक सेवांसह आता इतर दुकान सुरू होणार (मॉल सोडून) 


ग्रीन झोन




  • सगळं सुरु करायला परवानगी

  • 50 टक्के प्रवासी क्षमतेने ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू होणार

  • बसच्या फेऱ्या ग्रीन झोनमध्येच असणार त्याच्या क्षेत्राबाहेर बस जाणार नाही

  • खासगी कार्यालय 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार

  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणार

  • तर त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित


संबंधित बातम्या :