नाशिक : जिल्ह्यातील लासलगावमध्ये स्थानिक मजुरांनी बिबट्याच्या बछड्याला घेऊन सेल्फी काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकाराची सर्वत्र चर्चा सध्या सुरु आहे. वनप्राण्यांना हाताळताना काळजी घेण्याचं आवाहन अनेकदा वनविभागातर्फे केलं जातं. परंतु, नाशिकमध्ये मजुरांनी ऊसतोडणी करताना सापडलेल्या बछड्यासोबत चक्क फोटोसेशन केलं. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही केले आहेत.


नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या असल्याचं वारंवार समोर आलं आहे. सध्या ऊस तोडणीचं काम सुरु आहे. अशातच निफाडच्या कुरुडगाव शिवारात ऊसतोडणी सुरु असताना, बिबट्याचा बछडा सापडला. मात्र ऊसतोड कामगारांच्या मुलांनी न घाबरता या बछड्यांना उचलून घेत त्यांच्या सोबत फोटो आणि व्हिडोओ काढत ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. याप्रकारानंतर सर्वच स्तरांतून नाजारी व्यक्त केली जात असून हा सध्या चर्चेचा विषय बनलाय.


निफाड तालूक्यातील कादवा आणि गोदावरी नदीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती असल्यानं या परिसरातील अनेक गावांमध्ये नेहमीच बिबट्यांची दहशत असल्याचं आढळून आलं आहे. काल कुरूडगाव शिवारात ऊसतोडणी सुरु असताना ऊसतोड कामगारांच्या मुलांना बिबट्याचे बछडा आढळून आला. मात्र या मुलांनी अजिबात न घाबरता या बछड्याला उचलून घेतलं. त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. याच वेळी या बछड्याबरोबर सेल्फी काढत त्याचा व्हिडीओसुध्दा काढला. बिबट्याची मादी जवळपास असेल याचा विचार न करता त्यांनी या बछड्याबरोबर फोटो काढले. त्यानंतर पुन्हा या बछड्यांना त्यांनी ऊसाच्या क्षेत्रात सोडून दिलं, बिबट्याची मादी जवळपास असती तर मोठा अर्नथ घडला असता. या मजुरांवर मादीने हल्लाही केला असता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :