Live Updates: अमहदनगरमध्ये जोडे मारून अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तारांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
अहमदनगर : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच्या निषेधार्थ अमदनगरच्या दिल्ली गेट परिसरात राष्ट्रवादीकडून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मंत्री सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Abdul Sattar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तरांच्या वक्तव्यावर नाराज. सत्तारांना फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कान टोचले. वक्तव्यावर माफी मागण्याचे सत्तारांना शिंदेंचे आदेश. वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदेंनी बोलावली प्रवक्त्याची बैठक. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते व महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद न साधण्यावर मुख्यमंत्री काढणार वट हुकुम.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुण्यातील बालगंधर्व चौकात हा निषेध केला. सत्तारांच्या फोटोला काळं फासत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन समोर अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे प्रकार चालणार नाहीत असा इशारा काँग्रेसचे प्रदेसाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलेचा आपमन घडणे ही फार गंभीर बाब आहे. हा विषय माफी मागून सुटणार नाही. तर सरकारने सत्तार यांचा राजीनामा घेतला पाहिजे आशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सत्तार यांच्या औरंगाबादमधील निवास्थासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक देखील केली.
सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत सत्तार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यासर अनेक नेते महिला राजकारण्यांना टार्गेट करून सतत बदनान करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, यांना चाप बण्यासाठी सत्तार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. महिलांचा अपमान करने हा भाजपचा युएसपी आहे, अशी टीका देखील यावळी अंधारे यांनी भाजपवर केली.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची मला माहिती आता मिळाली आहे. सुप्रिया सुळे या जेष्ठ नेत्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याकडून तसं काही वक्तव्य झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं शिंदे गटाने प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द काढल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मंत्री सत्तार यांना आव्हान देत तुमच्या मागे- पुढे ज्या लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरता, तुम्ही फक्त नगर जिल्ह्यातून कसे जाता हेच पाहतो, असं आमदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे. सत्तेची हवा यांच्या डोक्यात घुसली आहे, अब्दुल सत्तार म्हणजे एक सरडा आहे, असं आमदार लंके यांनी म्हणाले आहेत.
शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मुंबईतील बोरिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले असल्याचे तक्रारीत नोंदण्यात आले आहे.
अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानंतर मंत्रालयाची सुरक्षा वाढवली
मंत्रालय परिसराला छावणीचं स्वरूप
मंत्रालयाच्या मेन गेटवर पोलीसांचा फौजफाटा तैनात
राष्ट्रवादी कॅाग्रेसचे कार्यकर्ते मंत्रालयावर धडकण्याची शक्यता
त्याआधीच पोलीसांनी मंत्रालयाला दिला पहारा
सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सिल्लोडमधील पोलीस सतर्क झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट असला तरी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्यभर आंदोलन होत असताना।सिल्लोड मध्ये सध्यातरी शांतता असल्याचे चित्र आहे.
सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सिल्लोडमधील पोलीस सतर्क झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट असला तरी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्यभर आंदोलन होत असताना।सिल्लोड मध्ये सध्यातरी शांतता असल्याचे चित्र आहे.
Abdul Sattar: राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, 'माफी काही नही है, महिलांचा अपमान सहन करणार नाही.'
Abdul Sattar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी ही मागणी केली आहे.
Abdul Sattar: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर केलेल्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आता अब्दुल सत्तार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'महिलांबद्दल असं काही बोललो नाही. मी महिलांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. महिलांचा जर अनादर झाला असेल तर मी माफी मागतो.' अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
Abdul Sattar: राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक (NCP) झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं देखील राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटलं आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
Abdul Sattar: महिलांचा अपमान करणे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अब्दुल सत्तारच नाही तर कोणत्याही नेत्याने अशाप्रकारे वक्तव्य करू नयेत असे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले.
Amol Kolhe: अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अपशब्द वापरल्यानंतर आता राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तारांची मस्ती उतरवू अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने महिलाबद्दल आदरयुक्तपणे टीका केली पाहिजे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
Abdul Sattar: मुंबईत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक देत आक्रमक घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटकाव केला आहे.
Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. परंतु आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं आणि तोच शब्द वापरणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांनी अशा प्रकारे शब्द वापरणं चुकीचं आहे. त्यांनी शब्द मागे घेतला पाहिजे असे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटले.
पार्श्वभूमी
Supriya Sule: कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेदेखील आक्रमक झाले आहेत. पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माघावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी होत आहे.
सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारणार
सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. अब्दुल सत्तारांना सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. राज्यभर सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारुन त्यांच्या पुतळ्याचं दहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार आहे. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -