नागपूर : लिंगायत हा वेगळा धर्म नसून तो हिंदू धर्मामधील एक पंथ आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा राज्य सरकारचा विचार नाही, असं अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात म्हटलं आहे.
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या संदर्भात विधानसभेत लेखी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.
2014 मध्ये केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने राज्य सरकारला पाठवलेल्या अभिप्रायानुसार वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच केंद्रीय गृहखात्यानेही वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्मातील पंथ असल्याचं 2013 साली राज्य सरकारला कळवलं होतं.
यामुळेच 2011 च्या जनगणनेत लिंगायत समाजाची स्वतंत्र नोंद घेण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या या अभिप्रायाच्या आधारे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देता येणार नाही, असं लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे.
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं झाली आहेत.
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा विचार नाही : राज्य सरकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 08:04 PM (IST)
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या संदर्भात विधानसभेत लेखी प्रश्न विचारला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -