नंदुरबार : नवापूर शहरासह तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी परिसरात शुक्रवारी मद्यरात्री विजेचा कडकडाटासह नवापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी नवापूर शहरातील डी जे अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या इमारतीवर वीज पडण्याचा मोठा आवाज झाला व क्षणातच शाळेच्या इमारतीवर वीज पडली.


शाळेत एकूण 500 विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने जीवितहानी टळली असून, वीज पडल्यामुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नवापूर येथील डी जे अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूलची इमारत तीन मजली आहे. चौथ्या मजल्यावर सिमेंटची पाण्याची टाकी आहे. साडे दहा वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि थोड्या वेळाने वीज शाळेतील पाण्याचा टाकीवर पडली.टाकीचे दोन ठिकाणाचे भाग कोसळून विटा सिमेंटचे तुकडे तिसऱ्या मजल्यावर आल्याने मोठा आवाज झाला विद्यार्थी व शिक्षक घाबरुन गेले. सर्व विद्यार्थी मैदानात आले.

इयत्ता पहिली ते दहावीचे सुमारे 500 विद्यार्थी घाबरून गेले लहान मुले रडायला लागली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावत मनातील भीती काढली व थोड्या वेळाने शाळेला सुट्टी दिली.

तळमजल्यावर इयत्ता पहिली ते चौथी व नववी दहावी चे चार वर्ग व कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्यावर पाचवी ते आठवी आणि इतर वर्ग आहेत. तिसऱ्या मजला एक छोटा रूम त्यावर चौथ्या मजल्यावर पाण्याची टाकी बांधली आहे. येथे वीज पडली होती.

नवापूर शहरातील डि जे अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवापूर शहरातील सुमारे 500 विद्यार्थी शिकत आहे. या शाळेतील संचालक मंडळाने शालेय इमारत अद्ययावत सुविधायुक्त तयार केली आहे. परंतू शुक्रवारी वीज पडल्याने वीज रोधक यंत्र बसण्याची मागणी पालकांनी केली आहे.