धुळे : भारतीय सैन्यातील, सुरक्षा दलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानाच्या पत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत एसटी महामंडळाने वीरपत्नींसाठी ही सवलत दिली.


याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सूचना एसटीच्या सर्व कार्यालयांना पारित झाल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय यांना या संदर्भात एसटीने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

सुरुवातीला शहीद जवानांच्या पत्नीला एसटीचा आजीवन मोफत प्रवास राहणार आहे. टप्प्याटप्य्याने वीर पिता म्हणजे शहीद जवानाचे वडील, वीर माता म्हणजे शहीद जवानाची आई यांना देखील लवकरच ही सवलत मिळणार आहे.