एलआयसीने कोविड-19 महामारीमुळे देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पॉलिसीधारकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. एलआयसीनं म्हटलं आहे की, फेब्रुवारी महिन्याच्या प्रीमियमसाठी दिलेला वाढीव कालावधी 22 मार्चला संपणार आहे. आता ही अवधी 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ज्या विमाधारकांच्या विम्याला आरोग्य तपासणीशिवाय फेरमुदत देता येणे शक्य आहे, त्या प्रकरणांत ऑनलाईन कार्यवाही केली जाईल. विम्याचे हप्ते भरताना एलआयसीच्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. आवश्यक माहिती संकेतस्थळावर दिल्यास विम्याचा हप्ता भरता येईल. एलआयसी पे डायरेक्ट हे मोबाइल अॅप डाऊनलोड करूनही हप्ता भरता येईल.
नेट बँकिंग, कार्डद्वारे करा पेमेंट
ज्यांना आपल्या प्रिमियमचं पेमेंट या काळात करायचं आहे त्यांच्यासाठी देखील एलआयसीने सोय केली आहे. नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम, फोनपे, गूगल पे, भीम, यूपीआय या माध्यमातून ज्यांना प्रिमियम भरायचा आहे, ते भरु शकतात. तसेच आयडीबीआय बँक आणि अॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये आणि ब्लॉक स्तरावरील सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) रोख रकमेद्वारे देखील प्रिमियम भरता येऊ शकते.
Corona World Update | जगभरात कोरोनाचे जवळपास 17 लाख 80 हजार रुग्ण
सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर कोरोनामुळे विमाधारकाचा मृत्यू झाला तर अन्य प्रकरणांप्रमाणेच भरपाईचा दावा प्राधान्याने स्वीकारून वारसाला भरपाईची रक्कम तातडीने दिली जाईल, असे शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे आतापर्यंत 16 विमाधारकांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आल्याची माहिती एलआयसीकडून देण्यात आली आहे.