मुंबई : कोरोनासारख्या आजारातून आपण सगळेजण शिकतचं आहोत. हे संकट माणसांची मनं अलवार केल्याशिवाय राहणार नाही. हे संकट दुःखाची जाणीव दिल्याशिवाय राहणार नाही. आपली परंपरा ओढून घेण्याची नाही तर वाटून खाण्याची आपली संस्कृती आहे. आपल्याला संकटातून मार्ग काढायाचा आहे. माती, निती, आणि संस्कृती हातात घालून चालते त्याचं नाव महाराष्ट्र आहे. त्यामुळे एक भाकरी आपण सगळे मिळून खाऊ असे मत सामजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर त्या बोलत होत्या.


सध्या सगळ्यांनी सगळ्यांना सांभाळूण घेण्याचा काळ सुरु आहे. अडचणीच्या काळात मदत त्याच्याकडे संधी म्हणून बघतं आहे. त्यांनी संधी म्हणून बघू नका. सगळ्यांना मदत करायचे आवाहन सिंधुताईंनी केले आहे. थोडी वाट बघा या सगळ्यातून आपण नक्की बाहेर पडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माझा कट्टा | सिंधुताई म्हणतात...सारे भाऊ, भाकरी मिळून खाऊ! लॉकडाऊनमध्ये सिंधुताईंचे अनुभव | Majha Katta



पोलीस आणि डॉक्टर्स यांचीही काळजी घेतली पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे आपल्या संरक्षणासाठी ते आज घराबाहेर पडत आहे. हे संकट पेलायच आहे आणि हे संकट मिळून संकटावर मात करायची आहे. सध्याच्या घडीला सगळ्यांची भूक महत्त्वाची आहे.आपल्याला जगायचं आहे हा विचार प्रत्येकाच्या मनात. त्यातून चांगलंच होणार आहे असंही सिंधुताई म्हणाल्या.

"या संकटाच्या इतक्या ज्वाळा उठल्या आहेत तरीही लोक, जनता, लेकरं ही फिनिक्स भरारी घेतील याची मला खात्री मला आहे. हे संकट संपणार आहे. ही रात्र सरुन उद्याची स्वप्न आपण पाहणार आहोत". हे संकट संपल्यानंतर नवराष्ट्राची निर्मिती होईल. वाईटपणा सोडून द्या मानवता शिका असंही माई म्हणाल्या.
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. मुक्ताई, ज्ञानेश्ववर, बहिणाबाईंचा देश आहे. "हे संकट संपणार आहे.. ही रात्र सरुन उद्याची स्वप्न आपण पाहणार आहोत", याची खात्री आहे.