Mohan Bhagwat ON LGBT: सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी एलजीबीटी समुदायाचं समर्थन केलं आहे. एलजीबीटी समुदायाच्या गोपनियतेचा आदर केला पाहिजे. एलजीबीटी वर्ग ही समस्या नसून त्यांचा स्वत:चा पंथ आहे असं ते म्हणाले आहेत. तर भारतातील मुस्लिमांना घाबरण्यासारखं काहीच नाही. भारतात इस्लाम समाजाला कोणताही धोका नाही. पण, तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे असा सल्ला भागवतांनी मुस्लीम समाजाला दिला आहे.


RSS चे प्रमुख मोहन भागवत यांनी पांचजन्यला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की,  एलजीबीटी समुदायाचं वेगळी ओळख असायलाच हवी. या विचाराला संघानं पाठिंबा दिला पाहिजे.  ट्रांसजेंडर समुदाय समस्या नाही. त्यांचा आपला पंथ आहे, त्यांचे देवी देवता आहेत, आता तर त्यांचे महामंडलेश्वर देखील आहेत, असं भागवत म्हणाले. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारतातील मुस्लिम समाजाला सल्ला दिला आहे. भारतातील मुस्लिमांना घाबरण्यासारखं काहीच नाही. भारतात इस्लाम समाजाला कोणताही धोका नाही.पण, तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे असं ते म्हणालेत.  


आमचा एकच आदर्श आहे आणि तो म्हणजे भगवा ध्वज... 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आमच्यासमोर कोणी व्यक्ती आदर्श नाही. तर आमचा एकच आदर्श आहे आणि तो म्हणजे भगवा ध्वज. आणि हेच संघाच्या पूर्वीच्या सर्व सरसंघचालकांनी सांगितल्याचे मत मोहन भागवत यांनी  व्यक्त केले आहे. ते नागपुरात बाल आणि किशोरवयीन स्वयंसेवकांच्या "नवोन्मेश" य कार्यक्रमात बोलत होते. मात्र, ध्वजासारख्या निर्गुण प्रतीकाला आपले आदर्श कसे मानायचे असा प्रश्न संघात येणाऱ्या बालकांसमोर उभा राहायचा. तर त्यासाठी संघात दोन महापुरुषांचे आदर्श पूर्वीपासूनच स्वयंसेवकांसमोर ठेवले जातात. आणि ते दोन महापुरुष म्हणजे रामभक्त हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज.  हे दोन महापुरुष संघाच्या स्वयसेवकांसाठी सर्वोच्च आदर्श असल्याचे मोहन भागवत म्हणाले.


संघात येणाऱ्या सर्व बाल आणि किशोर स्वंयसेवकानी ते जे काही करतात ते उत्तम पैकी उत्तम केले पाहिजे. हे उत्तम कार्य आपल्या स्वतःच्या अहंकारासाठी नाही, तर आपल्या मातृभूमीसाठी केले पाहिजे असा सल्ला ही सरसंघचालकांनी उपस्थित बाल स्वयंसेवकांना दिला.  या कार्यक्रमात बाल आणि किशोरवयीन स्वयंसेवकांनी शाररिक प्रात्यक्षिके सादर केले.  बाल स्वयंसेवकांचे असे जास्तीत जास्त प्रदर्शन सर्वांसमोर केल्यास संपर्कात येणाऱ्या प्रत्येक बालकासमोर देश कार्याचे असे भव्य स्वरूप ठेवता येईल. त्यामुळे त्यांना ही प्रेरणा मिळेलआणि आपला देश आज ज्या उंचीवर आहे, त्यापेक्षा 100 पट जास्त उंचीवर नेण्याची ताकत या बालकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.