Thane Crime News: ठाणे खंडणी विरोधी पथकाने (Thane ATS) एटीएम कार्ड (ATM Card) चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये (Bank Atm News) ग्राहकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड अदलाबदल करून  लंपास करत असे.आतापर्यंत महिला,वृद्ध नागरिक,मुले यांची लाखो रुपयांची  फसवणूक करणाऱ्या या टोळीकडून तब्बल विविध 35 बँकांचे 101 पेक्षा जास्त एटीएम कार्ड्स जप्त करण्यात आलेत.मुख्य आरोपी सनी सिंह सह त्याचे तीन साथीदार श्रीकांत गोडबोले,हरिदास मगरे आणि रामराव शिरसाठ या चार जणांच्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.


आरोपींची एक विशिष्ट कार्यपद्धती


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींची एक विशिष्ट कार्यपद्धती होती.त्यांनी विविध बँकांचे डुप्लिकेट एटीएम कार्ड्स आधीच बनवून ठेवलेले  असायचे. ठाणे जिल्ह्यातील शहरातील विविध  शहरांत ते एटीएम सेंटर्समध्ये जात आपले सावज हेरायचे.मग त्यांना मदत करण्याचा बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांचे ओरिजिनल एटीएम कार्डाशी आपल्याजवळचे डुप्लिकेट कार्ड अदला-बदली करायचे.बोलताना कार्डाचा पिन नंबरही सहज काढून घ्यायचे आणि तो ग्राहक बँकेतून गेल्यावर पुन्हा तात्काळ कार्डाचा वापर करून पैसे काढून पसार व्हायचे.


खंडणी विरोधी पथकाने  पंढरपूरला जात आरोपींच्या मुसक्या आवळल्या


ठाणे येथील एका महिलेची  सुद्धा अशाच प्रकारे फसवणूक करीत तिच्या अकाऊंट मधून 38,500 रुपये काढण्यात आले.या संबंधी महिलेने ठाणे पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आपल्या खबऱ्यांद्वारे  आणि सीसीटीव्ही फुटेज च्या तपासाद्वारे माहिती गोळा केली असता ही एक टोळीच असून हे आरोपी पंढरपूर येथे पळून गेल्याची माहिती मिळाली.त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने  पंढरपूर येथे जात आरोपींच्या मुसक्या आवळल्या..


दरम्यान हे सर्व आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून सर्वांवर याआधीही 15 च्या वर गुन्हे दाखल आहेत.सर्व आरोपींची 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


ही बातमी देखील नक्की वाचा