अहमदनर : नगरमधील पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे पाथर्डीतील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. पाथर्डी तीळ करडवाडी येथील तीन वर्षांच्या मुलाला बिबट्याने घरातून उचलून नेलं होतं. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी मुलाला शोधण्यासाठी शोधमोहिमही सुरु केली होती. त्यानंतर आज सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Continues below advertisement


अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. बिबट्याने काल रात्री आईच्या कुशीतून तीन वर्षांच्या मुलाला उचलून नेलं होतं. आज सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सार्थक बंधवत असं या तीन वर्षांच्या मुलाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह, स्थानिकांनीही मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आज सकाळी मुलाचा मृतदेह आढळून आला.


राजुरा तालुक्यात आठ ग्रामस्थांना ठार मारणारा RT1 वाघ अखेर जेरबंद, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक


दरम्यान, बिबट्याने घरातून तीन वर्षांच्या मुलाला उचलून नेल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काल संध्याकाळपासूनच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने मुलाचा शोध घेणं सुरु होतं. गेल्या 15 दिवसांमध्ये बिबट्यानं हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. तसेच पाथर्डीत धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :