राज्यभरातील सुमारे 1300 जलयुक्त शिवारची कामं आहेत जिथे गैरव्यवहार झाला आहे. अशा ठिकाणी जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावरच या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ असं जलंसधारण मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार, जलसंधारण मंत्र्यांची कबुली
जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत पुन्हा उपस्थीत कऱण्यात आला. गेल्या आठवड्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता.
आज याबाबत प्रश्न उपस्थित होताच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा तिच उत्तरे द्यायला सुरुवात केली. तेव्हा विरोधकांनी यावर आक्षेप घेताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्वत: यामध्ये हस्तक्षेप करत लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले.
Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी मुख्यमंत्र्यांचे डावपेच, लवकरच नियुक्ती | ABP Majha