चंद्रपूर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 39 जवान शहीद  झाल्यानंतर देशभरात शोक आणि संतापाची लहर आहे. दरम्यान या हल्ल्याच्या वेळी चूक कुठे झाली शोधून काढायला हवे, असे मत सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले आहे. या हल्ल्यामुळे सैनिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. दहशतवादी सतत संधीच्या शोधात असतात,  आपण त्याचा मुकाबला केला पाहिजे असेही ते म्हणाले.


काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. यात सुमारे 39 जवान शहीद झाले आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपुरात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड जनरल निंभोरकर यांनी घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे. असून चूक कुठे झाली शोधून काढायला हवे असे म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरात सीआरपीएफच्या गाडीला अतिरेक्यांच्या विस्फोटकांनी भरलेल्या गाडीनं धडक दिली यात 39 भारतीय जवान शहीद झाले आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला टार्गेट केले.  लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी मार्गावर स्फोट घडवला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबार केला. यात 39 जवान शहीद झाले आहेत. तर 20 पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत.

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा भागात लष्करी जवानांवर हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.  या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचं ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.

संबंधित बातम्या

Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद